Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल जळगावात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल
    क्राईम

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल जळगावात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रJanuary 6, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव प्रतिनिधी । बसस्थानक आवारात एसटी कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या एका वकीलावर जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

    याबाबत माहिती अशी की, बस महामंडळाचे विलीनीकरण व्हावे यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून एस.टी.कर्मचारी हे संपावर आहे. दरम्यान बुधवार ५ जानेवारी रोजी रात्री ८ वाजता बसस्थानकाच्या आवारात संपकरी बसलेले असतांना ॲड. सतिष रोठे या व्यक्तीने एस.टी. कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करत असतांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बद्दल आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला आहे. याबाबत व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल अश्लिल शब्दाचा वापर करून बदनामी केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून जिल्हापेठपोलीस ठाण्यात आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या ॲड. सतिषचंद्र रोठे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    अजित पवार विमान दुर्घटना; घातपाताचा संशय, रोहित पवारांची स्वतंत्र चौकशी

    February 16, 2026

    संविधान धोक्यात; टिपू सुलतान मुद्द्यावर भाजपची राजकीय सोय : हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

    February 16, 2026

    ग्रामपंचायत बंद आंदोलन: विकासकामांवर परिणाम, सरकारकडे मागणी थेट

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.