Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » दोन गॅस सिलिंडरचा स्फोट : सात घरे जळून खाक
    क्राईम

    दोन गॅस सिलिंडरचा स्फोट : सात घरे जळून खाक

    editor deskBy editor deskApril 18, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जामनेर : प्रतिनिधी

    तालुक्यातील पिंपळगाव चौखंबे येथे दोन गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. यामुळे लागलेल्या आगीत सात घरे जळून खाक झाली. या भीषण आगीत चार शेळ्यांचा भाजून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास घडली. या आगीत सात शेतकऱ्यांच्या घरातील साहित्य जळून खाक झाले.

    मिळालेल्या माहितीनुसार, पिंपळगाव चौखंबे येथील एका घरात अचानक स्फोट झाला आणि आग लागली, आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी ग्रामस्थ जमले असता त्याचवेळी बाजूलाच असलेल्या समाधान पाटील यांच्या घरातून घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन मोठा आवाज झाला. यामुळे आगीचे पुन्हा रौद्र रुप घेतले. जामनेर नगरपालिकेच्या अग्निशमन पथकाला बोलावून आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले, त्याचवेळी एका घरातील आणखी एका गॅस सिलिंडरचा स्फोट झाला.

    या आगीत वासुदेव पाटील, ज्ञानेश्वर पाटील, संतोष पाटील, संजय बोराळे, जीवन पाटील, प्रवीण पाटील, धनराज पाटील यांचे घर जळून खाक झाले. तसेच घरातील संसारोपयोगी वस्तू, अन्नधान्य, भांडीकुंडी, शेतमालाचे पैसे व कपडे जळून राख झाले. आगीत चार बकऱ्यांचा भाजून मृत्यू झाला तर दोन दुचाकींचेही नुकसान झाले. दोन बैल व दोन वासरे भाजले आहेत. माहिती मिळतात निवासी नायब तहसीलदार प्रशांत निंबोळकर, तलाठी आर. व्ही. सुपेकर, फत्तेपूर पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    इस्लामाबादमध्ये नमाजवेळी मशिदीत भीषण बॉम्बस्फोट; 50 ठार, 70 हून अधिक जखमी

    February 6, 2026

    जळगाव महानगरपालिकेच्या १७व्या महापौरपदी दीपमाला काळे, उपमहापौरपदी मनोज चौधरी

    February 6, 2026

    पोलीस–वन विभागात नोकरी लावण्याचे आमिष; चाळीसगावात ६ लाखांची फसवणूक

    February 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.