Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » नशिराबाद येथील २१ वर्षीय विवाहितेची गळफास घेवून आत्महत्या
    क्राईम

    नशिराबाद येथील २१ वर्षीय विवाहितेची गळफास घेवून आत्महत्या

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रJanuary 5, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नशिराबाद पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद

    जळगाव प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील २१ वर्षीय विवाहितेने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आत्महत्या करण्यापुर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    समीना बानो शेख अफसर (वय-२१) रा. नशिराबाद ता.जि. जळगाव असे मयत तरूणीचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, समीना बानो ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. सोमवार ३ जानेवारी रोजी विवाहितेने राहत्या घरात कुणीही नसतांना छताला दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास उघडकीला आले. आत्महत्या करण्यापुर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यात म्हटले आहे की, “माझ्याकडून सासूच्या आजारपणाची सेवा होवू शकत नसल्याने आत्महत्या करत आहे” असे नमूद केले आहे. घरातील सदस्य घरी आल्यावर हा प्रकार लक्षात आला. नातेवाईकांसह शेजारच्यांनी तातडीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी मयत घोषीत केले. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र साळुंखे करीत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    शेतात पाणी भरण्यास निघालेल्या तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू

    February 16, 2026

    दारूच्या नशेत वाद, तरुणाचा निर्घृण खून; अल्पवयीनसह दोघे ताब्यात

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.