Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » कोरोना : राज्यातील सर्व महाविद्यालय व विद्यापीठ १५ फेब्रुवारीपर्यंत बंद- उदय सामंत
    राज्य

    कोरोना : राज्यातील सर्व महाविद्यालय व विद्यापीठ १५ फेब्रुवारीपर्यंत बंद- उदय सामंत

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रJanuary 5, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई वृत्तसंस्था । राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यातील सर्व विद्यापीठ, महाविद्यालये १५ फेब्रुवरीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय मंत्रीमंडळाने घेतला आहे. अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. त्यामुळे सर्व परिक्षा ऑनलाईन पध्दतीने घेण्यात येणार असल्याची दिली आहे.

    राज्यातील महाविद्यालयांसंदर्भात काल सर्व विभागीयआयुक्त, राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, सर्व कुलगुरू यांच्या समवेत उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची ऑनलाईन बैठक झाली. या बैठकीत कोविड 19 संसर्गाबाबत प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला. विद्यार्थीं, पालक, प्राध्यापक आणि कर्मचारी यांच्या सोबत आरोग्य सुरक्षितते बद्दल सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

    उदय सामंत म्हणाले, राज्यातील फक्त अकृषी विद्यापीठ नाही तर इतर खासगी विद्यापीठांना सुद्धा हा निर्णय लागू राहणार आहे, सर्व विद्यापीठाने ऑनलाईन परीक्षा घेण्याचा निर्णय काल मान्य केला आहे. परीक्षांमध्ये अडचणी येत असतील तर महाविद्यालयांनी, विद्यापीठांनी हेल्पलाइन नंबर देण्याचा सूचना दिल्या आहेत. महाविद्यालयासोबत वस्तीगृहदेखील बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जे विद्यार्थी परदेशातून व इतर राज्यातून संशोधन करण्यासाठी आलेले आहेत त्यांच्यासाठी वस्तीगृहाची सोय सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    राज्यात उष्णतेचा कहर, अवकाळी पावसाचा तडाखा : दुहेरी संकटात शेतकरी-नागरिक हैराण

    April 18, 2026

    धार्मिक यात्रेवरून परतताना काळाचा घाला : जिल्ह्यातील एकाच कुटुंबातील ३ जण ठार

    April 18, 2026

    इन्स्टाग्रामच्या आडून तरुणींचे शोषण: ‘ब्रेकअपनंतर प्लेबॉय बनलो’ : मुख्य आरोपीचा धक्कादायक कबुलीजबाब

    April 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.