Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » सिंधी कॉलनी, तांबापूरासह इतर ९ ठिकाणी जुगार अड्ड्यांवर पोलीसांचा छापा; २९ जणांवर गुन्हे दाखल
    क्राईम

    सिंधी कॉलनी, तांबापूरासह इतर ९ ठिकाणी जुगार अड्ड्यांवर पोलीसांचा छापा; २९ जणांवर गुन्हे दाखल

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रJanuary 4, 2022No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : शहरातील वेगवेगळ्या भागात अवैध धंदे सुरू असल्याच्या तक्रारी पोलिस अधीक्षकांकडे प्राप्त झाल्या होत्या. त्या तक्रारींची दखल घेत मंगळवारी ४ जानेवारी रोजी दुपारी पोलिस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांच्यासह पथकाने शहरातील ९ ठिकाणी छापेमारी केली. ९ जुगार अड्ड्यावर कारवाई करून २९ जुगारांवर संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून २ लाख ४१ हजार ९४२ रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

    स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्यासह पथकाने ९ ठिकाणी छापेमारी करून पोलीसांनी रोकड व मुद्देमाल जप्त केला. यात ९० हजार ९४२ रूपयांची रोकड, जुगाराचे साहित्य आणि १ लाख ५१ हजार रूपये किंमतीच्या तीन दुचाकी, ३१ हजार रूपयांचे मोबाईल असा एकुण २ लाख ४१ हजार ९४२ रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

    शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्केट, शिरसोली रोडवरील एल.एच पाटील हायस्कूलच्या पाठीमागील मोकळ्या जागेत, सिंधी कॉलनी, तांबापुरातील शेरा चौक, अब्दुल हमीद चौक तांबापुरा, गुजराल पेट्रोल पंप परिसर, कुंभारवाडा, सोमानी मार्केट पिंप्राळा आणि शनिपेठ हद्दीतील इस्लामपूर या नऊ ठिकाणी पोलीसांनी छापा टाकला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात चार, जिल्हापेठ पोलीस ठाण्यात २, शनिपेठ पोलीस ठाण्यात २ आणि रामानंदनगर पोलीस ठाण्यात एक असे ९ स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    भुसावळात शस्त्रसाठा उघड; तरुणाच्या अटकेने सुरक्षा प्रश्न ऐरणीवर

    May 3, 2026

    शॉर्टसर्किटचा कहर; चटई कंपनीपासून तीन कंपन्यांपर्यंत आगीचा फैलाव

    May 3, 2026

    हळदीच्या कार्यक्रमाहून परतताना अपघात, तरुण ठार तर एक जखमी !

    May 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.