Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जलाशयात पोहताना तीन मुली बुडाल्या ; दोघांचा मृत्यू
    क्राईम

    जलाशयात पोहताना तीन मुली बुडाल्या ; दोघांचा मृत्यू

    editor deskBy editor deskApril 1, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    सातारा : वृत्तसंस्था

    राज्यातील अनेक ठिकाणी धक्कादायक घटना घडत असतांना अशीच एक घटना महाबळेश्वर तालुक्यातून एक ह्रदयद्रावक घटना समोर आली आहे. कोयना विभागातील वाळणे गावातील कोयना जलाशयात पोहायला गेलेल्या ३ मुली बुडाल्या होत्या. त्यातली दोन मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर एका मुलींना वाचवण्यात यश आलं आहे. सर्व मुली १२ ते १३ वयोगटातील असून वाळणे गावावर शोककळा पसरली आहे.

    सातारा जिल्ह्यातल्या पश्चिम भागात असणाऱ्या वाळणे गावच्या हद्दीत पोहण्यासाठी गेलेल्या तीन मुली शिवसागर जलाशयात बुडाल्या होत्या. यामधील दोन मुलींचा मृत्यू झाला असून एका मुलीवर उपचार सुरू आहेत. मृत दोन्ही मुली या अल्पवयीन आहेत तर वाचवण्यात आलेल्या मुलीवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घडलेल्या घटनेमुळे तापोळ्यासह वाळणे वेंगळे गावावर शोक काळा पसरली आहे. याची माहिती मिळताच महाबळेश्वर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून याची नोंद महाबळेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मराठा आरक्षणात सहा महिन्यांचा दिरंगाई; फक्त ९८ जणांना मिळाले प्रमाणपत्र !

    February 24, 2026

    आदित्य ठाकरेंनी अधिवेशनात सरकारला धरले धारेवर, लाडकी बहीण, प्रदूषण आणि भ्रष्टाचाराचे प्रश्न!

    February 24, 2026

    “अजित पवारांचा अपघात अपघात नाही? रोहित पवारांचा VSR–DGCAवर धक्कादायक आरोप!”

    February 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.