Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » भीषण अपघात : पती-पत्नी जागीच ठार
    क्राईम

    भीषण अपघात : पती-पत्नी जागीच ठार

    editor deskBy editor deskMarch 31, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भंडारा : वृत्तसंस्था

    राज्यातील अनेक जिल्ह्यात अपघाताच्या घटना घडत असतांना एक भीषण अपघाताची बातमी भंडाऱ्यातून समोर आली आहे. चारचाकीची दुचाकीला धडक बसल्याने भीषण अपघात झालाय. या अपघातात पती-पत्नी जागीच ठार झाले आहेत. तुमसर मार्गावरील खापा येथील घटना असून पती-पत्नीच्या मृत्यूने गावात शोककळा पसरली आहे.

    सविस्तर वृत्त असे कि, तुमसर-रामटेक राष्ट्रीय महामार्गावर कार पती-पत्नी दुचाकीवरून जात होते. अपघातात भोजराम कोल्लू राणे (५५) तर रत्ना भोजराम राणे (५०) रा.सालई खुर्द अशी मृतकांची नावे आहेत. तुमसर तालुक्यातील सालई खुर्द येथील भोजराम राणे आपल्या पत्नी रत्ना यांच्यासह मोटारसायकलने तुमसर येथे एका नातेवाईकाकडे गेले होते.

    त्यांना भेटून आपल्या गावाकडे परत जात असताना खापा शिवारात विरूद्ध दिशेने येणाऱ्या कारच्या चालकाने कार निष्काळजीपणे चालवून ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्न केला. ओव्हरटेक करताना मोटारसायकलला धडक बसली. यात दुचाकीस्वार पती-पत्नी गंभीर जखमी झाले.

    पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पती-पत्नी दोघांनाही उपचाराकरीता उपजिल्हा रूग्णालय तुमसर येथे पाठविण्यात आले. परंतू जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने पती-पत्नी दोघांनाही पुढे भंडाऱ्याला हलविण्यात आले. येथे पतीचा मृत्यू झाला. तर पत्नीला पुढे नागपुरला नेण्यात आले तेव्हा वाटेतच त्यांचीही प्राणज्योत मालवली. पती-पत्नीचा अपघातात मृत्यू झाल्याने सालई खुर्द येथे शोककळा पसरली आहेच. तुमसर पोलिसांनी कार चालकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे तसेच पुढील कारवाई सुरू आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मराठा आरक्षणात सहा महिन्यांचा दिरंगाई; फक्त ९८ जणांना मिळाले प्रमाणपत्र !

    February 24, 2026

    आदित्य ठाकरेंनी अधिवेशनात सरकारला धरले धारेवर, लाडकी बहीण, प्रदूषण आणि भ्रष्टाचाराचे प्रश्न!

    February 24, 2026

    “अजित पवारांचा अपघात अपघात नाही? रोहित पवारांचा VSR–DGCAवर धक्कादायक आरोप!”

    February 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.