Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » गोमांस विकणाऱ्या दोघांना अटक
    क्राईम

    गोमांस विकणाऱ्या दोघांना अटक

    editor deskBy editor deskMarch 30, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    रावेर : प्रतिनिधी

    शहरातील बारीवाड्यालगत उघड्यावर अवैधरीत्या २० किलो मांस विक्री करताना शेख इमरान शेख लूकमान (वय २०, रा. सिद्धार्थ नगर, रावेर) यास रावेर पोलिसांनी शुक्रवारी पकडले. त्याच्याजवळून पाच हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याचबरोबर गोमांस पुरवठा करणाऱ्यासही अटक केली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, रावेर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक गणेश धुमाळ व त्यांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने आकस्मिक धाड टाकून ही कारवाई केली. या आरोपीसह त्याने हे मांस खरेदी करून आणलेल्या रसलपूर येथील आरोपीलाही पकडले. त्याच्याकडील अवैध मांस, सुरा, लाकडी गुद्दा, तराजू, वजनमापे असा पाच हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पशुधन विकास अधिकारी डॉ. रणजित पाटील यांनी ‘ते’मांस असल्याची खातरजमा केल्यावर रावेर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने तालुक्यातील रसलपूर येथील शेख नवाब शेख इसाक (कुरेशी) याच्याकडून विक्रीसाठी मांस आणल्याची कबुली दिल्याने शेख नवाब शेख इसाक यासही अटक करण्यात आली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    रस्त्याच्या कडेला रक्तबंबाळ मृतदेह; तपासात उलगडले मृत्यूचे गूढ

    June 23, 2026

    “पैसे द्या, तरच मिळेल अनुदान”; शेतकऱ्याला लाचेची मागणी महागात ; जामनेरात खळबळ !

    June 23, 2026

    पाळधीजवळ मृत्यूचा तांडव; समोरासमोरच्या धडकेत तिघांचा जागीच अंत!

    June 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.