Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » २२ वर्षीय विवाहितेवर सामुहिक अत्याचार
    क्राईम

    २२ वर्षीय विवाहितेवर सामुहिक अत्याचार

    editor deskBy editor deskMarch 22, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मलकापूर : वृत्तसंस्था

    पळसखेड ता. चिखली येथील 22 वर्षीय विवाहित शेतमजूर महिलेला दुचाकीवर तोंड बांधून आणून तिघांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केल्याची घटना मलकापुर शहरातील तुलसी नगर भागात घडली. याबाबत पीडीतीने मलकापूर शहर पोस्टला दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध कलम 363,366,376 376(ड),506 भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय.याप्रकरणी तिघाही आरोपींना शहर पोलिसांनी अटक केली आहे. या तिघांना आज न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने सहा दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

    चिखली तालुक्यातील 22 वर्षीय शेतमजूर विवाहिता दि.19 मार्च मंगळवार रोजी पळसखेड ते डोंगर शेवली रस्त्यावरील मळ्यात शेती कामावर गेली होती. सायंकाळी पाच वाजेदरम्यान दुचाकीवर आलेल्या अनोळखी दोघांनी तिला मोटरसायकलवर मध्ये बसवून तिचे तोंड बांधून मलकापूर येथे मित्राच्या रुमवर आणले. मित्राच्या रुमवर तिघांनी दांगडो सुरु केला आरडाओरड केल्यास फाशी देण्याची धमकी तिघांनी विवाहितेला दिली. आरडाओरड ऐकून घर मालकीणीने चौघांना घराबाहेर काढून दिले. त्या तिघा नराधमांनी दुसऱ्या मित्राच्या रुमवर नेवून दि.19 मार्च चे मध्यरात्री पासुन दि.20 मार्चचे सकाळी सात वाजेपर्यंत आळीपाळीने तिघांनी बलात्कार केला व पीडितेला बुलढाणा रोडवर सोडून तिघांनी पलायन केले.

    सदर पिडीता रोडवर रडत दिसल्याने स्थानिय नागरीकांनी तिची विचारपूस केली असता तिने आपबिती सांगितल्याने तिला शहर पोलीस स्टेशनला आणले पिडीतिने शहर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी देवराम गवळी, मलकापूर शहर पोलीस निरीक्षक अनिल गोपाळ, सपोनी करुणाशील तायडे, म.पो.काॅ वैशाली गायकवाड, पो.काॅ मंगेश चरखे, पो.काॅ. अशोक सुरडकर, पो.काॅ मनोज उमाळे आदिंनी सदरच्या फिर्यादीवरून विशाल भगवान शेवाळे (वय 33 रा. विशवी ता. मेहकर जि.बुलढाणा), सुरज पंढरी शेवाळे (वय 30 रा.विशवी ता. मेहकर), आकाश संजय शेजुळ (वय 25 रा. वडगाव तेजन ता. लोणार) या तिघांविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्यांना आज पहाटे अटक केली. आज या तिघांना न्यायालयासमोर उभे केले असता दि. २६ मार्चपर्यंत सहा दिवसाची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मराठा आरक्षणात सहा महिन्यांचा दिरंगाई; फक्त ९८ जणांना मिळाले प्रमाणपत्र !

    February 24, 2026

    आदित्य ठाकरेंनी अधिवेशनात सरकारला धरले धारेवर, लाडकी बहीण, प्रदूषण आणि भ्रष्टाचाराचे प्रश्न!

    February 24, 2026

    “अजित पवारांचा अपघात अपघात नाही? रोहित पवारांचा VSR–DGCAवर धक्कादायक आरोप!”

    February 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.