Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगाव जि.प.चे नवीन सीईओ शुभम गुप्ता तर मनपा आयुक्त डॉ.गायकवाड यांची बदली
    जळगाव

    जळगाव जि.प.चे नवीन सीईओ शुभम गुप्ता तर मनपा आयुक्त डॉ.गायकवाड यांची बदली

    editor deskBy editor deskMarch 20, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या मंगळवारी करण्यात आल्या. यात, धुळे जिल्हा परिषदेचे सीईओ शुभम गुप्ता यांची जळगाव जिल्हा परिषदेच्या सीईओपदी नियुक्ती करण्यात आली. तर, जळगाव जिल्हा परिषदेचे सीईओ अंकित यांची बुलढाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती झाली आहे. जळगावच्या मनपा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांचीही बदली झाली असून त्यांना पदस्थापना देण्यात आलेली नाही.

    अंकित गेल्या ९ महिन्यांपूर्वीच जळगाव जि.प.त रूजू झाले होते. आठवड्यापासून त्यांच्या बदलीची चर्चा सुरू होती. सामान्य प्रशासन विभागाचे नितीन गद्रे यांचे आदेश जळगाव जि. प. ला प्राप्त झाल्यानंतर त्यांच्या बदलीवर शिक्कामोर्तब झाला आहे.

    विद्या गायकवाड यांची बदली
    महानगरपालिकेच्या आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांची बदली झाली आहे. त्यांचा पदभार अतिरिक्त आयुक्त पल्लवी भागवत यांच्याकडे सोपविण्यात येणार आहे. गायकवाड यांना अद्याप कुठेही पदस्थापना देण्यात आलेली नाही.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    चोपड्यात मोठा गुन्हा टळला; पिस्तूल-काडतूसांसह दरोडेखोरांची टोळी पोलिसांच्या जाळ्यात!

    March 20, 2026

    भरदिवसा मिरचीपुड टाकून ५.२७ लाखांची लूट; सराईत गुन्हेगार जेरबंद !

    March 20, 2026

    हरिपुरा धरणाजवळ अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळला; ओळख पटवण्याचे आवाहन !

    March 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.