Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » गिरणा नदीपात्रात उडी घेत प्रौढाने संपवले जीवन
    क्राईम

    गिरणा नदीपात्रात उडी घेत प्रौढाने संपवले जीवन

    editor deskBy editor deskMarch 13, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    वर्दळीचा रस्ता असलेल्या सुमारे शंभर फुट उंच असलेल्या बांभोरी पुलावरुन नदीपात्रात उडी घेत ज्ञानेश्वर गोंविदा नन्नवरे (कोळी) (वय ४५, रा. बांभोरी प्र. चा. ता. धरणगाव) यांनी आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना मंगळवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास घडली. त्यांच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी पाळधी दूरक्षेत्र पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील बांभोरी गावात ज्ञानेश्वर गोविंदा नन्नवरे हे कुटुंबियांसह वास्तव्यास असून ते शेतमजूरी करुन कुटुंबाचा उदनिर्वाह करीत होते. मंगळवारी दुपारच्या सुमारास ते घराबाहेर पडल्यानंतर ते गावाजवळच असलेल्या गिरणा नदीवरील गेले. याठिकाणी सुमारे शंभरफुट उंच असलेल्या पुलावरुन नदीपात्रात उडी घेतली. नदीपात्रात पाणी नसल्यामुळे त्याठिकाणावरील खडकावर आदळून त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यामुळेच ज्ञानेश्र्वर नन्नवरे यांचा दुर्देवी मृत्यू झाला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    शेतात पाणी भरण्यास निघालेल्या तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू

    February 16, 2026

    दारूच्या नशेत वाद, तरुणाचा निर्घृण खून; अल्पवयीनसह दोघे ताब्यात

    February 16, 2026

    दौलत नगर परिसरात तरुणाने आयुष्य संपविले !

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.