Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » बकऱ्या चोरणारे सहा जण अटकेत
    क्राईम

    बकऱ्या चोरणारे सहा जण अटकेत

    editor deskBy editor deskMarch 9, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चाळीसगाव : प्रतिनिधी

    तालुक्यातील मेहुणबारे पोहरे येथील शेतकऱ्यांच्या गोठ्यातून बकऱ्या चोरणाऱ्या सहा जणांना अटक करण्यात आली आहे. चोरीची ही घटना डिसेंबर महिन्यात घडली होती.

    मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्यांमध्ये लक्ष्मण दशरथ माळी (२२, रा. डामरुण, ता. चाळीसगाव), रोहन उर्फ माऊली ज्ञानेश्वर पवार (२३). राहल रामदास मोरे (२०, दोन्ही रा. पातोंडा, ता. चाळीसगाव), सौरव संतोष मोरे (२१, रा. सांगवी, ता. पाचोरा), दीपक प्रकाश सोनवणे (१९) आणि कपिल अशोक वाघ (२७, दोन्ही रा. पोहरे, ता. चाळीसगाव) यांचा समावेश आहे.

    पोहरे गावातील मनोज सोनवणे यांच्या गोठ्यातून डिसेंबर महिन्यात नऊ बकऱ्या चोरीस गेल्या होत्या. याबाबत लक्ष्मण माळी याला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने वरील पाच जणांची नावे घेत आणि त्यांनी बकऱ्या चोरून विकल्याचे सांगितले. त्यानंतर या पाचही जणांना अटक करण्यात आली. मेहुणबारे पोलिस ठाण्याचे एपीआय संदीप परदेशी, पोकों, योगेश मांडोळे, प्रताप मथुर, गोरख चकोर, सुदर्शन घुले, राकेश काळे, संजय लाटे, दीपक महाजन यांनी ही कामगिरी बजावली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    चाळीसगाव शहरात जैन मंदिरासमोर गोडाऊनला अचानक आग !

    March 10, 2026

    महाराष्ट्रात गॅस टंचाईचा अलर्ट: उद्योग आणि हॉटेल व्यवसाय ठप्प!

    March 10, 2026

    बारामती विमान दुर्घटना प्रकरण तापले; कंपनी मालकाची चौकशी, घातपाताचाही संशय

    March 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.