Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जिल्हा नियोजन मधून 28 कोटी निधी – पालकमंत्री गुलाबराव पाटील
    जळगाव

    जिल्हा नियोजन मधून 28 कोटी निधी – पालकमंत्री गुलाबराव पाटील

    editor deskBy editor deskMarch 6, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    पोलीस कामकाजाचे स्वरूप दिवसेंदिवस विस्तारत असून त्यासाठी आधुनिक यंत्रणा, सुसज्ज कार्यालय अत्याधुनिक साधन सामुग्री असणे ही काळाची गरज झाली आहे. त्यासाठीच नविन पोलीस स्टेशनचे बाधकाम करण्यात येत आहे.जिल्ह्यातील पोलीस दलाच्या सक्षमिकरणाला प्राथमिकता देण्यात आली असून इमारत, वाहने इत्यादीसाठी जिल्हा वार्षिक नियोजनमधून 28 कोटी एवढा निधी देण्यात आल्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आज सांगितले.

    पाळधी व रामानंद येथील नविन पोलीस स्टेशन इमारत बांधकामाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी यावेळी आमदार राजू मामा भोळे, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दतात्रय कराळे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी , चाळीसगाव अप्पर पोलीस अधिक्षक कविता नेरकर, जळगाव अप्पर पोलीस अधिक्षक अशोक नखाते , धरणगाव पोलीस निरीक्षक उमेश डमाळे, चोपडा उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक सचिन शिरसाठ , जिल्हा परिषद सदस्य प्ताताप्राव पाटील, सा.बा.चे कार्यकारी अभियंता गिरीश सूर्यवंशी, राजू परदेशी, प्रांजळ पाटील, उप अभियंता एस.डी. पाटील, योगेश अहिरे, पाळधी बु. चे सरपंच विजय सिंग पाटील, उपसरपंच राहुल ठाकरे, पाळधी खु. चे सरपंच लक्ष्मीबाई कोळी, उपसरपंच भारती पाटील, सरीताताई कोल्हे माळी, आशुतोष पाटील, ग्राम विकास अधिकारी पाठक सचिन पवार , संजय पाटील सर, आदि उपस्थित होते.

    पालकमंत्री म्हणाले, पोलीस आपल्या सुरक्षेसाठी 24 तास देतात, ही त्यांची सेवा अत्यंत महत्वाची असून त्यांना कोणत्याही साधनाची कमतरता पडू नये असा शासनाचा प्रयत्न आहे. जिल्हा प्रशासनाचे प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे उत्तम काम करत असून ते कामाच्या बाबतीत ‘ नो पेंडसी कलेक्टर ‘ आहेत.

    पोलीस प्रशासनाचे कर्तव्य आहे जनतेच्या सुरक्षितता पुरविण्याची, ते कर्तव्य आम्ही करत आहोत. पोलीस बळकटीकरणासाठी पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांनी जिल्हा वार्षिक नियोजनामधून निधी मिळवून दिल्या बद्दल गौरवपूर्ण उल्लेख करून नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दतात्रय कराळे यांनी गुन्हेगारी थांबविण्यासाठी जनतेला सहकार्याचे आवाहन केले. या दोन्ही पोलीस स्टेशनच्या इमारती एका वर्षात पूर्ण करून अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

    आज एस. आर. पी. एफ चा वर्धापन दिन असून बरोबर 76 वर्षापूर्वी आजच्या दिवशीच स्थापन झाली होती. आज तो योग गाठून दोन्ही पोलीस स्टेशनच्या इमारतीचे भूमीपूजन होत असल्याचे सांगून पोलीस स्टेशन हे सर्वसामान्यांच्या संरक्षणाचे ठिकाण आहे, घाबरण्याचे नाही. त्यामुळे नागरिकांनी गुन्हेगारी संपविण्यासाठी पोलिसांना मदत करावी असे प्रतिपादन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले.
    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दीपक पवार यांनी केले. प्रास्ताविकात पोलीस उपअधिक्षक सुनील नंदवाडकर यांनी नवीन पोलीस स्टेशन बांधकाम बाबत सविस्तर महिती विषद केली. तर आभार पोलीस निरीक्षक उमेश डमाळे यांनी मानले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    वेश्याव्यवसायावर पोलिसांचा छापा : दोन दलालांना अटक

    February 24, 2026

    लाडकी बहिणींना जानेवारीचा हप्ता; लाखो महिलांच्या खात्यात जमा

    February 24, 2026

    कर्जत घाटवर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत चालकाचा मृत्यू, बसमधील प्रवासी जखमी

    February 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.