Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जामनेर तालुक्यात सालदाराच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू
    क्राईम

    जामनेर तालुक्यात सालदाराच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रDecember 27, 2021No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लाईव्ह महाराष्ट्र न्यूज :- जामनेर तालुक्यातील कुंभारी सीम शिवारातील शेतात काम करणाऱ्या सालदाराच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू झाल्याने गावात खळबळ उडाली आहे.

    कुंभारी सीम येथील पोलीस पाटील योगेश रमेश पाटील यांचे काका सुरेश गंगाराम पाटील यांच्या शेतात वर्षभरापासून मूळचा मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील मुंडिया ( पोस्ट – चिरिया ) येथील रहिवाशी दरबार मिठाराम बारेला ( पावरा , वय ५५ ) सालदार म्हणून कामाला आहे . तो शेतातच कुटुंबियांसह राहतो . या दाम्पत्याला ४ मुले आणि ३ मुली मिळून ७ अपत्ये आहेत . या दाम्पत्याला दारूचे व्यसन असल्याचेही सांगण्यात आले. किरकोळ वादातून त्यांच्या नेहमी भांडणे होत असत .

    आज सकाळी शेतमालक सुरेश पाटील शेतात गेले तेंव्हा त्यांना दरबार घरात दिसला नाही . त्यांनीं त्याची पत्नी मुन्नीबाईला आवाज दिला परंतु तिने प्रतिसाद दिला नाही . दरबार बाहेर गेला असेल असे समजून सुरेश पाटील निघून गेले . नंतर काही लोकांनी सुरेश पाटील यांना फोन करून सांगितले की मुन्नीबाई उठत नाहीय. सुरेश पाटील यांनी पुतण्या आणि कुंभारी सिमचे पोलीस पाटील योगेश पाटील यांना या घटनेची माहिती देत बोलावून घेतले.नंतर पोलीस पाटलांनी तिला जामनेरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले . तेथे डॉक्टरांनी सल्ला दिल्याप्रमाणे जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात आणले . येथे सीएमओ डॉ यासिम खान यांनी मुन्नीबाईला मृत घोषित केले . कुंभारी सिमचे पोलीस पाटील योगेश पाटील यांनी या घटनेची माहिती जामनेर पोलिसांना दिली . सीएमओ डॉ यासिम खान यांनी दिलेल्या खबरीवरून जळगाव शहर पोलीस ठाण्यात माहिती देण्यात आली .

    जळगाव शहर पोलीस ठाण्याचे पो उ नि जगदीश मोरे व यांनी सीएमओ डॉ यासिम खान यांनी या मृतदेहाची पाहणी केली त्यावेळी मुन्नीबाईच्या शरीरावर कपाळ , पोट , हात – पाय , पाठ आणि मांड्यांवर अशा अनेक ठिकाणी मारहाणीमुळे झालेले काळे – निळे व्रण दिसत होते . जबर मारहाणीत या महिलेचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

    जामनेर पोलीस ठाण्याचे पो नि किरण शिंदे यांनी मुन्नीबाईचा पती दरबार मिठाराम बारेला ( पावरा ) याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे या घटनेची नोंद जळगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून घेण्यात आली असून गुन्हा पुढील तपासासाठी जामनेर पोलीस ठाण्याकडे वर्ग केला जाणार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    फेसबुकवरील जाहिरातीवर विश्वास ठेवला अन् २१ लाख गमावले!

    October 20, 2026

    जळगाव-बांभोरी पुलावर भीषण अपघात; तीन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर, अखेर गुन्हा दाखल !

    October 20, 2026

    काळवीट प्रकरणात वनरक्षक निलंबित!

    October 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.