Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » बक्षीस म्हणून मागितले लाख रुपये : ऑपरेटर अटकेत तर ग्रामसेवक पसार
    क्राईम

    बक्षीस म्हणून मागितले लाख रुपये : ऑपरेटर अटकेत तर ग्रामसेवक पसार

    editor deskBy editor deskFebruary 17, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    यावल येथे स्वावलंबन योजनेचा निधी मंजूर झाल्यानंतर त्यापोटी बक्षीस म्हणून एक लाख रुपये लाच मागितल्यानंतर लाच रक्कम स्वीकारल्याप्रकरणी चुंचाळे ग्रामपंचायतीचा ऑपरेटर सुधाकर धुडकू कोळी (35, चुंचाळे) यास जळगाव एसीबीने अटक केली तर चुंचाळे ग्रामसेवक हेमंत कमलाकर जोशी (चुंचाळे) हा फरार झाला आहे. हा सापळा शनिवार, 17 रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास यशस्वी करण्यात आला.

    मिळालेल्या माहितीनुसार, चुंचाळे येथील 46 वर्षीय तक्रारदाराच्या तक्रारीनुसार, चुंचाळे, ता.यावल गावी त्यांच्या वडिलांच्या नावाची संस्था असून त्यामध्ये 15 वित्त आयोगाच्या शिफारशीतून गावात शिलाई मशीन प्रशिक्षण देवून ग्रामीण भागातील महिला व युवतीना स्वावलंबी करण्यासाबाबत केंद्र शासनाकडून दोन लाख रुपये निधी मंजूर झाला होता. मंजूर निधीतून तब्बल 50 टक्के बक्षीस म्हणून एक लाखांची लाच ग्रामसेवक हेमंत जोशी यांनी शुक्रवार, 16 रोजी मागितली होती. तक्रारदाराने याबाबत शुक्रवारी जळगावी तक्रार नोंदवल्यानंतर लाचेची पडताळणी करण्यात आली.

    शनिवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचल्यानंतर ग्रामसेवकाने लाचेची रक्कम ऑपरेटर यांच्याकडे देण्यास तक्रारदाराला सांगितल्यानंतर ऑपरेटर सुधाकर कोळी यांनी लाच स्वीकारताच त्यांना अटक करण्यात आली तर ग्रामसेवक हेमंत जोशी यांना सापळ्याबाबत कुणकुण लागताच ते पसार झाले. दोघांविरोधात यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

    यांनी केली कारवाई
    हा सापळा जळगाव पोलिस उपअधीक्षक सुहास देशमुख यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक अमोल वालझाडे, पोलिस निरीक्षक एन.एन.जाधव, एएसआय दिनेशसिंग पाटील, नाईक बाळू मराठे, नाईक सुनील वानखेडे, एएसआय सुरेश पाटील, हवालदार रवींद्र घुगे, महिला हवालदार शैला धनगर, किशोर महाजन, प्रदीप पोळ, प्रणेश ठाकुर, अमोल सूर्यवंशी आदींच्या पथकाने यशस्वी केला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    महामार्गावर भीषण अपघात; भरधाव ट्रकच्या धडकेत मजूर ठार, एक गंभीर !

    February 24, 2026

    वेळ संपल्याने बँड बंद; पुन्हा वाजविण्यास नकार दिल्याने बँडमालकावर हल्ला !

    February 24, 2026

    भरधाव दुचाकीची भीषण धडक; मोठे वाघोद्यात युवकाचा मृत्यू !

    February 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.