Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » माजी नगरसेवकावर भरदिवसा गोळीबार : राज्यात गुन्हेगारी वाढली
    क्राईम

    माजी नगरसेवकावर भरदिवसा गोळीबार : राज्यात गुन्हेगारी वाढली

    editor deskBy editor deskFebruary 16, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अहमदनगर : वृत्तसंस्था

    राज्यातील जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरात गेल्या काही दिवसापूर्वीच एका माजी नगरसेवकावर गोळीबार करीत खून केल्याची धक्कादायक घटना घडल्यानंतर आता पारनेर नगरपंचायतचे नगरसेवक युवराज पठारे यांच्यावर गुरुवार गावठी कट्ट्याने गोळ्या झाडण्याचा प्रयत्न झाला. या घटनेत पठारे बचावल्याची माहिती घटनास्थळावरुन मिळाली. पारनेर शहरातील एका हॉटेल नजीक हा प्रकार घडला. या घटनेनंतर पाेलिसांनी एकास ताब्यात घेतले आहे.

    मिळालेल्या माहितीनूसार ही घटना सकाळी साडे अकराच्या सुमारास घडली. घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनूसार नगरसेवक युवराज पठारे यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न झाला मात्र गावठी कट्ट्यातून गोळी झाडता न आल्यामुळे त्यांच्यावरील संकट टळले. या घटनेनंतर पठारेंनी व अन्य काही जणांनी संबंधितास पकडले. पोलिसांनी संबंधितास ताब्यात घेतले आहे. संशयित हा अल्पवयीन आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. त्याने पठारे यांच्यावर का हल्ला केला याचे कारण अद्याप स्पष्ट समजू शकलेले नाही अशी माहिती पोलिस निरीक्षक समीर बारवकर यांनी दिली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    महामार्गावर भीषण अपघात; भरधाव ट्रकच्या धडकेत मजूर ठार, एक गंभीर !

    February 24, 2026

    वेळ संपल्याने बँड बंद; पुन्हा वाजविण्यास नकार दिल्याने बँडमालकावर हल्ला !

    February 24, 2026

    भरधाव दुचाकीची भीषण धडक; मोठे वाघोद्यात युवकाचा मृत्यू !

    February 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.