Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » २१ जणांच्या दृष्टीला मिळाली नवी चकाकी ; देवकर हॉस्पिटलमध्ये एकाच दिवशी पार पडल्या शस्त्रक्रिया
    आरोग्य

    २१ जणांच्या दृष्टीला मिळाली नवी चकाकी ; देवकर हॉस्पिटलमध्ये एकाच दिवशी पार पडल्या शस्त्रक्रिया

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रDecember 24, 2021No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लाईव्ह महाराष्ट्र न्यूज : जळगाव येथील श्री गुलाबराव देवकर मल्टीस्पेशालिटी वैद्यकीय व आयुष रुग्णालयाने गुरुवारी एकाच दिवसात 21 जणांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून त्यांच्या दृष्टीला नवी चकाकी दिली आहे.

    जळगाव शहरातील विख्यात नेत्रतज्ञ डॉ वृषाली विवेक पाटील, भूलतज्ञ डॉ. स्नेहल गिरी, आॅप्थोमॅट्रेस जयेश वाल्हे, डॉ. विजय सरताळे यांच्या टीमने या शस्त्रक्रिया पूर्ण केल्या. समन्वयाचे काम डॉ. नितीन पाटील यांनी केले. रुग्णांना दुसऱ्याच दिवशी चष्मा वाटप करून घरी सोडण्यात आले.

    गेल्या आठवडाभरापासून देवकर रूग्णालयात ना नफा ना तोटा तत्त्वावर मोतिबिंदू शस्त्रक्रिया महाअभियान राबविले जात आहे. यात अवघ्या 2500 रुपयात मोतीबिंदू शस्त्रक्रिया व अवघ्या सहा हजार रुपयात फेको शस्त्रक्रिया केली जात आहे. या अभियानांतर्गतच या 21 रुग्णांच्या दृष्टीला गुरुवारी नवी चकाकी मिळाली आहे. या 2500 रुपयात रुग्णाच्या राहण्याची व भोजनाची मोफत व्यवस्था असून, शस्त्रक्रियेपूर्वीची संपूर्ण तपासणी, मधुमेह, रक्तदाब तपासणी व रक्त चाचण्यांची तपासणी मोफत केली जात आहे. फिटनेस सर्टिफिकेट मिळाल्यानंतर त्यांच्यावर दर गुरुवारी या सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया केल्या जात आहेत.

    अन् … रुग्णाचा फेकोला वाढता प्रतिसाद..

    देवकर रूग्णालयात पूर्व तपासणी केल्यानंतर मोतीबिंदूसाठी फेको तंत्रज्ञानाने शस्त्रक्रिया करण्याला अधिक रुग्णांची पसंती असल्याचे दिसून येत आहे. अवघ्या सहा हजार रुपयात ही शस्त्रक्रिया होणार आहे. त्यामुळे फेको शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी रुग्णांकडून सतत विचारणा होत आहे.

    तपासणी पूर्णपणे मोफत

    या महाअभियानांतर्गत ना नफा ना तोटा तत्त्वावर अभियान राबविले जात असल्याने डोळ्यांची तपासणी व रुग्णाच्या फिटनेस सर्टिफिकेटसाठी आवश्यक सर्व तपासण्या मोफत केल्या जात आहेत. यापुढेही डोळ्यांची समस्या असलेल्या रुग्णांनी गुरुवारपूर्वीच मोफत पूर्वतपासणी करून घ्यावी, असे आवाहन रुग्णालय प्रशासनाने केले आहे. रुग्णांनी डॉ. नितीन पाटील मो नं. 9422977071 व 7507724200 यावर संपर्क साधावा.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    जुन्या वादातून तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला !

    March 14, 2026

    जळगावात प्रौढाने संपविले आयुष्य !

    March 14, 2026

    मिनी ट्रकला भीषण आग; तीन स्फोट, चालकाची प्रसंगावधानाने जीवितहानी टळली

    March 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.