Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » चारचाकीतून आलेल्या पाच जणांनी झाडल्या माजी नगरसेवकावर गोळ्या
    क्राईम

    चारचाकीतून आलेल्या पाच जणांनी झाडल्या माजी नगरसेवकावर गोळ्या

    editor deskBy editor deskFebruary 8, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चाळीसगाव : प्रतिनिधी

    चारचाकीतून आलेल्या पाच जणांनी भाजपचे माजी नगरसेवक बाळासाहेब मोरे यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केल्याची धक्कादायक घटना बुधवार दि. ७ जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास हनुमानवाडी परिसरात घडली. यामध्ये बाळासाहेब मोरे हे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ नाशिक येथे हलविण्यात आले आहे. या घटनेमुळे चाळीसगावात खळबळ माजली असून ही संपुर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील भाजपचे माजी नगरसेवक बाळासाहेब मोरे हे त्यांच्या रेल्वे स्थानकाजवळील हनुमानवाडीतील कार्यालयात नेहमीप्रमाणे बसले होते. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास चारचाकी वाहनाने पाच जण कार्यालयाच्या बाहेर आले. गाडीतून उतरताच ते श्री. मोरे यांच्या कार्यालयात शिरले आणि समोर बसलेल्या मोरे यांच्यावर त्यांनी अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली.
    हल्लेखोरांनी मोरे यांच्यावर सहा गोळ्या झाडल्यानंतर हल्लखोर वाहनात बसून पसार झाले. बाळासाहेबत यांच्या सहकाऱ्यांसह त्यांना तत्काळ शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी उपचार केल्यानंतर त्यांना नाशिक येथे हलविण्यात आले आहे. माजी नगरसेवक बाळासाहेब मोरे यांच्यावर गोळीबार झाल्याची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्यासह कर्मचारी त्याठिकाणी दाखल झाले. याठिकाणी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे पोलिसांची अतिरिक्त कुमक मागवण्यात आली होती.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    चाळीसगाव शहरात जैन मंदिरासमोर गोडाऊनला अचानक आग !

    March 10, 2026

    महाराष्ट्रात गॅस टंचाईचा अलर्ट: उद्योग आणि हॉटेल व्यवसाय ठप्प!

    March 10, 2026

    बारामती विमान दुर्घटना प्रकरण तापले; कंपनी मालकाची चौकशी, घातपाताचाही संशय

    March 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.