Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जि.प.च्या माध्यमिक वरिष्ठ लिपीकास लाचलुचपत विभागाकडून अटक
    क्राईम

    जि.प.च्या माध्यमिक वरिष्ठ लिपीकास लाचलुचपत विभागाकडून अटक

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रDecember 23, 2021Updated:December 23, 2021No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अनुदानीत शिक्षणसेवक पदासाठी मागीतली २ लाख ३० हजारांची ‘लाच’

    लाईव्ह महाराष्ट्र न्यूज :जळगाव येथील आर.आर.विद्यालयात विनाअनुदानीत तत्वावरून अनुदानीत शिक्षण सेवक पदावर नियुक्तीच्या मान्यतेसाठी तब्बल २लाख,३०हजार रूपयांची लाच मागीतल्याप्रकरणी जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागातील वरिष्ठ लिपीक योगेश खोडपे  याच्या विरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    जळगाव येथील आर.आर.माध्यमिक विद्यालयात तक्रारदार यांचे भाउ शिक्षणसेवक म्हणून सन २०१४ पासून कार्यरत आहेत. त्यास अनुदानित तत्वावर शिक्षणसेवक पदावर नियुक्तीच्या मान्यतेसाठी जिल्हा परिषदेत माध्यमिक शिक्षण विभागात कार्यरत वरिष्ठ लिपीक योगेश अशोक खोडपे, (रा.ममता राणे नगर,वाघनगर जळगाव,) याने १२ फेब्रुवारी २०२१ रोजी २ लाख ३० हजार रूपयांची मागणी वेळोवेळी करण्यात आली आहे. तक्रारदाराने यासंदर्भात लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली होती.
    त्यानुसार नाशिक परिक्षेत्राचे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पोलीस अधिक्षक सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनानुसार जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधिक्षक शशिकांत पाटील यांच्या पथकाकडून अधिक पडताळणी करीत २३ डिसेंबर रोजी सापळा लावण्यात आला.

    जि.प.माध्यमिक शिक्षण विभाग वरिष्ठ लिपिक योगेश खोडपे याने अनुदानीत तत्वावर शिक्षणसेवक पदी नियुक्ती अहवालासाठी तक्रारदाराकडे २ लाख 30 हजार रूपयांच्या लाचेची मागणी पंचासमक्ष केल्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अधिकार्‍यांकडून लाचेची मागणी केली यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक करण्यात आली.
    हि कारवाई जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधिक्षक तथा पर्यवेक्षण अधिकारी शशिकांत पाटील यांचेसह पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव, स.फौ. सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहिरे, सुनिल पाटील, रविंद्र घुगे, शैला धनगर, पो.ना.मनोज जोशी, जनार्दन चौधरी, पो.कॉ.प्रविण पाटील, महेश सोमवंशी, नासिर देशमुख, ईश्वर धनगर, प्रदिप पोळ यांच्या पथकाने केली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    शेतात पाणी भरण्यास निघालेल्या तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू

    February 16, 2026

    दारूच्या नशेत वाद, तरुणाचा निर्घृण खून; अल्पवयीनसह दोघे ताब्यात

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.