Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » शासकीय वाहनाचा अपघात : तहसीलचे तीन कर्मचारी जखमी
    क्राईम

    शासकीय वाहनाचा अपघात : तहसीलचे तीन कर्मचारी जखमी

    editor deskBy editor deskJanuary 23, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था

    जिल्ह्यातील ऑफिसचे काम संपवून सिल्लोडला निघालेल्या शासकीय वाहनाचा झालेल्या अपघातात तहसील कार्यालयातील तीन कर्मचारी जखमी झाल्याची घटना छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात घडली. या घटनेतील जखमी झालेल्या लोकांना सिल्लोड येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. व त्यांच्यावर उपचार सुरू आहे.

    या अपघाताबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, छत्रपती संभाजी नगर सिल्लोड मार्गावर केरळा फाटा जवळील पेट्रोल पंप समोर हा अपघात झाला. तहसील कार्यालयाचे वाहन एका उभ्या असलेल्या वाहतुकीच्या वाहनास धडकले यामध्ये तिघेही जण जखमी झाले आहे.

    या तिघांना सिल्लोड येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे. या घटनेत वाहन चालक कयूम देशमुख, कोतवाल राजीव बसेय्या, आणि वसीम शेख अशी जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहे. आपले कार्यालयीन कामकाज संपवून हे सिल्लोड कडे येत होते. त्या दरम्यान उभे असलेल्या वाहनास पाठीमागून त्यांच्या वाहनाने जोरदार धडक दिली. जीपच्या पुढील भागाचा अक्षरशः चुराडा झालेला आहे. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवित हानी झालेली नाही. पोलीस या घटनेचा तपास करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मध्यरात्री घरात घुसून ४८ वर्षीय महिलेचा विनयभंग !

    February 23, 2026

    राजकीय वजन वाढवण्याची शिकवण, भावनिक आठवणींचा धगधगता प्रवास ; रोहित पवार !

    February 23, 2026

    रुग्णालयात पाच दिवसाच्या नवजात मुलीला सोडून आई फरार !

    February 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.