Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जीपीएसच्या विद्यार्थ्यांनी गिरवले खाकीचे धडे
    धरणगाव

    जीपीएसच्या विद्यार्थ्यांनी गिरवले खाकीचे धडे

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रDecember 19, 2021No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    प्रतिनिधी लक्ष्मण पाटील येथील जीपीएस कॅम्पस च्या विद्यार्थ्यांनी पाळधी पोलीस स्टेशनला भेट देऊन प्रत्यक्ष अनुभवातून पोलीस स्टेशन ही संकल्पना समजून घेतली. कृतीयुक्त शिक्षणातून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात येत आहे.

    भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील स्कूल कॅम्पस पाळधी येथील भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील इंग्लिश मीडियम स्कूल तसेच भाऊसाहेब गुलाबराव पाटील माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी पाळधी पोलीस स्टेशनला भेट देऊन प्रत्यक्ष अनुभवातून पोलीस स्टेशन ही संकल्पना समजून घेतली.
    कृतीयुक्त शिक्षण देणारी शाळा म्हणून अल्पावधीत जीपीएस ला नावलौकिक प्राप्त झाले आहे.  दि 18 रोजी प्राचार्यांच्या कृतीयुक्त शिक्षण ह्या संकल्पनेतून सर्व विद्यार्थ्यांनी पाळधी पोलीस स्टेशनला भेट दिली, प्रसंगी पाळधी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक  गणेशजी बुवा यांचा सत्कार करण्यात आला, तसेच सर्व पोलीस बांधवांचा गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला.

    पोलीस प्रशासनातर्फे क्षेत्रभेटीची परवानगी देण्यात आली तसेच विद्यार्थ्यांना पोलिस प्रशासन व त्याच्या कारभाराविषयी मार्गदर्शन करण्यात आले. कृतीयुक्त शिक्षणातून संकल्पना प्राप्ती या उपक्रमाचा विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद घेतला. सदर क्षेत्र भेटीप्रसंगी भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील इंग्लिश मीडियम स्कूल चे प्राचार्य  सचिन पाटील  ,भाऊसाहेब गुलाबरावजी पाटील माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य . डी. डी. कंखरे ,कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य योगेश करंदीकर  तसेच सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.

    पोलीस हा समाजाचा खरा रक्षक असतो, नाविन्यपूर्ण शिक्षणातूनच आदर्शवादी, शिस्तप्रिय, आणि सामाजिक जाणीवांचे भान असणारा विद्यार्थी तयार होतो असे प्रतिपादन एपीआय गणेशजी बुवा यांनी व्यक्त केले.
    शाळा प्रशासनाच्या वतीने प्राचार्य सचिन पाटील यांनी क्षेत्र भेटीची परवानगी देऊन विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्याबद्दल सर्व पोलीस बांधवांचे आभार मानून कृतज्ञता व्यक्त केली,सूत्रसंचालन . भूषण पाटील यांनी केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    धरणगावात महाशिवरात्री निमित्त भव्य शिवमहोत्सव; 21 आकर्षक झाक्यांची मिरवणूक

    February 11, 2026

    नशिबाला हरवून यशाला गवसणी; ममता नाकतोडेंची प्रेरणादायी भरारी !

    February 6, 2026

    धरणगावात बेकायदेशीर राहणाऱ्या इराणी महिलेची होणार भारतातून हकालपट्टी !

    February 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.