Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » भरदुपारी खाद्यपदार्थ विक्रेत्यावर प्राणघातक हल्ला
    क्राईम

    भरदुपारी खाद्यपदार्थ विक्रेत्यावर प्राणघातक हल्ला

    editor deskBy editor deskJanuary 16, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ : प्रतिनिधी

    शहरातील खडका रोडवरील हिरा हॉलजवळ शनिवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास जुन्या वादातून खाद्यपदार्थ विक्रेता अजीम शेख (३५) यांच्यावर चाकू व लोखंडी रॉड मारून प्राणघातक हल्ला करण्यात आला. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी अजीम खान यांच्या फिर्यादीवरून काफील खान ऊर्फ बंटी शकील खान (३६), शादाब खान ऊर्फ गोलू (२६) यांना ताब्यात घेतले. न्यायालयात हजर केले असता त्यांना १६ पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. रेहान शकील खान (२०) हा फरार आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, अजीम शेख हे खाद्यपदार्थ विक्री करून उदरनिर्वाह करतात. शुक्रवारी त्यांचा लहान भाऊ रईसोद्दीन शेख व मित्र शाहरुख खाटीक व आरोपीचा भाऊ यांच्या कुठल्यातरी कारणावरून वाद झाला होता. या वादाचा वचपा काढण्यासाठी खडका रोडवरील हिरा हॉलजवळ शनिवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास अजीम शेख येताच तिघांनी हल्ला केला. लोखंडी रॉडचा उपयोग करीत अजीम यांना मारहाण केली. चाकूने भोसकून गंभीर जखमी केले आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी कृष्णात पिंगळे, बाजारपेठ निरीक्षक बबन आव्हाड व डीबी पथकाने घटनास्थळी धाव घेतली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    दोन वाईन शॉप फोडणारा आरोपी एलसीबीच्या जाळ्यात; लाखोंचा मुद्देमाल जप्त

    February 21, 2026

    “मोठ्या लोकांचा पाठिंबा असल्यानेच धाडस?” : रोहित पवारांचा सवाल

    February 21, 2026

    गच्चीवर मंडप, तिथेच दहावीची परीक्षा; बीडमधील धक्कादायक नियोजनशून्यता

    February 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.