Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » खेळता खेळता ४ शाळकरी मुलाचा तलावात बुडून मृत्यू !
    क्राईम

    खेळता खेळता ४ शाळकरी मुलाचा तलावात बुडून मृत्यू !

    editor deskBy editor deskJanuary 12, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था

    राज्यातील छत्रपती संभाजी नगरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वाळूज परिसरातील रांजणगावच्या दत्तनगरातील ४ शाळकरी मुलांचा गुरुवारी बनकरवाडी तलावात बुडून मृत्यू झाला. विश्वजितकुमार सुखदेव उपाध्याय (१२), अफरोज जावेद शेख (१४), अबरार जावेद शेख (१२) व कुणाल अनिल दळवी (१२) अशी मृत मुलांची नावे आहेत. दोन भावंडांपैकी अफरोज मदरशात तर अबरार साईराम इंग्रजी शाळेत शिकत होता.

    मिळालेल्या माहितीनुसार, सर्व मुले एकाच भागात राहत असल्याने मित्र होती. गुरुवारी सायंकाळी खेळण्याच्या नादात ते घरातून बाहेर पडले. मात्र, उशिरापर्यंत परत न आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. बराच वेळानंतर जवळच असलेल्या बनकरवाडी तलावाच्या काठावर या मुलांचे कपडे दिसले. घटनेची माहिती मिळताच वाळूज एमआयडीसीचे पीआय अविनाश आघाव यांनी अग्निशमन विभागाला कळवले. पथकाने बुडालेल्या मुलांना बाहेर काढून घाटीत दाखल केले, पण डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मध्यरात्री घरात घुसून ४८ वर्षीय महिलेचा विनयभंग !

    February 23, 2026

    राजकीय वजन वाढवण्याची शिकवण, भावनिक आठवणींचा धगधगता प्रवास ; रोहित पवार !

    February 23, 2026

    रुग्णालयात पाच दिवसाच्या नवजात मुलीला सोडून आई फरार !

    February 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.