Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अनैतिक प्रेमसंबधातून बाळाला जन्म : उकिरड्यावर फेकल्याने थंडीत तडफडून मृत्यू !
    क्राईम

    अनैतिक प्रेमसंबधातून बाळाला जन्म : उकिरड्यावर फेकल्याने थंडीत तडफडून मृत्यू !

    editor deskBy editor deskJanuary 9, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नागपूर : वृत्तसंस्था

    देशभरातील अनेक शहरात नवजात शिशुना अनेक ठिकाणी फेकल्याच्या घटना घडत असतांना नुकतेच नागपूर शहरातून अशीच एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. प्रियकरासोबत असलेल्या अनैतिक प्रेमसंबधातून २१ वर्षीय तरुणी गर्भवती झाली. तिने बाळाला जन्म दिला. मात्र, बदनामीच्या भीतीने तिने बाळाला उकिरड्यावर फेकून दिलं. थंडीचा कडाका असल्याने बाळाचा तडफडून मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे फिरवत निर्दयी मातेला अटक केली आहे. या घटनेनं परिसरातून संताप व्यक्त केला जात आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २१ वर्षीय तरुणी मध्यप्रदेशातील रहिवासी आहे. तिचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. दोघांनी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यातून तरुणी गर्भवती झाली. गावात बदनामी होईल आणि कुटुंबीय आपल्याला मारहाण करतील, या भीतीपोटी दोघांनीही सप्टेंबर महिन्यात नागपूर गाठले. एका व्यक्तीच्या घरात दोघेही कामाला लागले. दरम्यान, तरुणीच्या प्रसुतीची वेळ आली असता, तिचा प्रियकर कामानिमित्त दुसऱ्या राज्यात निघून गेला. अखेर तरुणीने प्रसुतीसाठी एका महिलेची मदत घेतली. ४ जानेवारीला तिने घरातच एका गोंडस बाळाला जन्म दिला.

    या बाळाला काय नाव द्यायचं असा प्रश्न तरुणीसमोर होता. तिने बाळाचा जन्माची लपवणूक करून पुन्हा गावी जाण्याची योजना आखली. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास या निर्दयी मातेने आपल्या पोटच्या गोळ्याला उकिरड्यावर फेकून देत पळ काढला. परिसरातील एका व्यक्तीने बाळाचा रडण्याचा आवाज बघितला. त्याने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बाळाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांना बाळाला मृत घोषित केलं. याप्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे बाळाचा आईचा शोध घेतला.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    कर्जमाफीची मोठी घोषणा, पण शेतकरी नाराज; सरकारच्या निर्णयावर टीकेची झोड

    March 6, 2026

    अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना दिलासा; २ लाखांपर्यंत कर्जमाफी आणि बरेच काही !

    March 6, 2026

    मैं डंडा लेके बैठा हूँ! गडकरींचा पेट्रोलियम लॉबीवर थेट इशारा

    March 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.