धुळे : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या काही महिन्यापासून अपघाताची मालिका सुरु असतानी नुकतेच धुळे तालुक्यातील नवे भदाणे फाट्यावर रविवारी पहाटे ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक दुभाजकाला धडकला. यात ट्रक महामार्गावर उलटल्याने झालेल्या अपघातात चालकाचा मृत्यू झाला. शमीम छोटे खान (वय ४४, उत्तर प्रदेश) असे मयत झालेल्या चालकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अपघात घडला त्यावेळी सुदैवाने रस्त्यावर कोणतेही वाहन नव्हते. नाही तर मोठी दुर्घटना घडली असती. सीजी ०४ एमझेड ८२०५ क्रमांकाचा ट्रक धुळ्याकडून साक्रीच्या दिशेने वेगाने जात होता. नवे भदाणे फाटाजवळील हॉटेल बाळसखासमोर अचानक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रक दुभाजकाची भिंत तोडून उलटला. यात ट्रक बराच अंतर घसरत गेला. यात चालक शमीम छोटे खान (रा. बहेरी, बरेली, उत्तर प्रदेश) यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी धुळे तालुका पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद आहे


