Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » टेन्शन वाढणारी बातमी : मुंबईत कोरोनाची चिंता वाढली !
    क्राईम

    टेन्शन वाढणारी बातमी : मुंबईत कोरोनाची चिंता वाढली !

    editor deskBy editor deskJanuary 7, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    गेल्या मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णांचा संख्या वाढताना असतांना आता मुंबईकरांची चिंता वाढवणारी एक बातमी समोर आली आहे. त्यात कोरोनच्या नव्या व्हेरिएंट JN.1मुळे देखील धोका वाढला आहे. त्यात मुंबईत मागील वर्षभरातील पहिल्या कोरोना मृत्यूची नोंद झाली आहे.

    मुंबईत एका ५२ वर्षीय व्यक्तीचा ५ जानेवारी रोजी मृत्यू झाला आहे. मुंबईत शेवटचा कोविड मृत्यू ९ ऑगस्ट २०२३ रोजी झाला होता. या व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी पाच दिवस ताप, खोकला आणि श्वासोच्छवासाची तक्रार होती. रुग्णालयात दाखल करण्याच्या २४ तासांच्या आत रुग्णाचा मृत्यू झाला.

    राज्यात ६ जानेवारी रोजी कोरोनाच्या १५४ नव्या रुग्णांची भर पडलीय. १७२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर दोन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाचा नवा व्हेरियंट जेएन-१ च्या रुग्णांची संख्या १३९ वर पोहोचली आहे. त्यामध्ये सर्वाधिक रुग्ण हे पुण्यातील आहेत. पुण्यात एकूण ९१ रुग्ण असून त्या खालोखाल नागपूरमध्ये ३० रुग्णांची नोंद झालीय. ठाण्यामध्ये ५ तर बीडमध्ये ३, छत्रपती संभाजीनगरमध्ये ३ आणि नांदेडमध्ये २ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

    कोरोनाच्या या नव्या व्हेरियंटचे रुग्णसंख्ये वाढ होत असल्याने कोविड-१९ च्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्याची सूचना केंद्र सरकारने केली आहे. राज्यातही वाढती रुग्णसंख्या पाहता टास्क फोर्सने खबरदारी घेण्यास सुरूवात केली आहे. कोरोनाची लागण झाल्यास त्या व्यक्तीला ५ दिवस गृहविलगीकरणात ठेवण्यात येणार आहे. ताप, सर्दी आणि खोकला आढळल्यास कोविड चाचणी करुन घेण्याचा सल्ला टास्क फोर्सकडून देण्यात आला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अक्षय्य तृतीयेवर बालविवाह रोखण्यासाठी राज्यभर कडक बंदोबस्त; प्रशासनाचे सतर्कतेचे आदेश”

    April 19, 2026

    भोंदू बाबा खरात प्रकरणाला राजकीय वरदहस्त? श्याम मानवांचे स्फोटक आरोप; तपासावरही उपस्थित केले प्रश्नचिन्ह !

    April 19, 2026

    २४ तासांत चोरीचा पर्दाफाश : जळगाव पोलिसांची झटपट कारवाई !

    April 18, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.