Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी साधला मराठा कुटुंबाशी संवाद !
    जळगाव

    जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी साधला मराठा कुटुंबाशी संवाद !

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रJanuary 6, 2024Updated:January 6, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मराठा सर्वेक्षण कामकाजात जिल्हाधिकारी स्वतः सहभागी

    जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज स्वतः धरणगाव तालुक्यातील मुसळी गावातील मराठा कुटुंबास भेट देऊन प्रश्नावली भरून घेत संवाद साधला.

    राज्य मागासवर्ग आयोगाने जिल्हा प्रशासनाला घरोघरी जाऊन मराठा कुटुंबाचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार जळगाव जिल्ह्यात सर्वेक्षणास सुरूवात झाली आहे. याप्रसंगी मराठा – कुणबी शोध मोहीमेचे जिल्ह्याचे नोडल अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे, धरणगाव तहसीलदार महेंद्र सुर्यवंशी आदी उपस्थित होते.

    सर्वेक्षणासाठी शासनाकडून प्राप्त प्रश्नावलीनुसार मराठा कुटुंबाशी संवाद साधत सर्वेक्षण करून घेण्यात आले. जिल्हा व तालुकास्तरावर सर्वेक्षणात सहभागी होणाऱ्या शासकीय अधिकारी – कर्मचाऱ्यांनी मराठा कुटुंबाचे सर्वेक्षण करतांना कोण-कोणत्या‌ गोष्टींचा समावेश केला पाहिजे तसेच आस्थेवाईकपणे संवाद साधत कुटुंबाकडून त्यांच्या सामाजिक – आर्थिक परिस्थिती‌ कशी जाणून घ्यायचे, यांचे प्रशिक्षण अधिकारी – कर्मचाऱ्यांना देण्यासाठी स्वतः जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी मराठा कुटुंबास भेट दिली.

    मराठा कुटुंबासोबत संवाद साधत जिल्हाधिकाऱ्यांना या सर्वेक्षणासाठी एक तास दोन मिनिटे लागली. यामुळे प्रत्यक्ष एका कुटुंबाचे सर्वेक्षण करण्यासाठी किती वेळ लागू शकतो. यांची माहिती झाली. याचा उपयोग अधिकारी – कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी होणार आहे. असे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    नातेवाईकाचाच संशय? निवृत्ती नगरात सव्वा लाखांचे सोन्याचे दागिने लांबविले !

    March 4, 2026

    बारामती विमान दुर्घटनेवर नवे प्रश्न; रोहित पवारांचा ‘क्रिमिनल अँगल’चा इशारा

    March 4, 2026

    जिल्ह्यात ड्रग्जविरोधी मोठी कारवाई; पहूर पोलिसांचा धडक छापा, २२ लाखांचा मुद्देमाल जप्त

    March 4, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.