Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » डीजेचा दणदणाटामुळे लग्नघरी आले दुख : वरपित्याचा मृत्यू !
    क्राईम

    डीजेचा दणदणाटामुळे लग्नघरी आले दुख : वरपित्याचा मृत्यू !

    editor deskBy editor deskJanuary 3, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पंढरपूर : वृत्तसंस्था

    शहरात सोमवार, १ जानेवारी रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास डीजेचा दणदणाट वरपित्याच्या जीवावर बेतल्याची घटना घडली. मुलाच्या हळदीच्या वरातीत वरपिता सहभागी झाले होते. मात्र डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे वरपिता हे जागेवरच कोसळले. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांचा उपचाराआधीच मृत्यू झाला. त्यामुळे भरलेल्या लग्नमंडपात शोककळा पसरली आणि जेथून पारण्याची वरात निघायची तेथून वरपित्याची अंत्ययात्रा निघाली. पंढरपूर शहरात घडलेल्या या दुर्दैवी घटनेत सुभाष देवमारे (५८) यांचा मृत्यू झाला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूर येथील सुभाष देवमारे यांच्या मुलगा अमित देवमारे या तरुणाचा मंगळवार, २ जानेवारी रोजी दुपारी लग्न सोहळा आयोजित करण्यात आला होता. डीजेच्या दणदणाटामध्ये नरदेवाची हळदीची वरात सोमवारी रात्री काढण्यात आली. भक्ती मार्ग येथील घरापासून काढण्यात आलेली नवरदेवाची हळदीची वरात पंढपूरमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक, चौफाळा व पुढे काळा मारुती मंदिरासमोर आल्यानंतर डीजेचा आवाज मोठ्या प्रमाणात होता. त्या कर्णकर्कश आवाजामुळे रात्री ८.४५ वाजता वरपिता सुभाष देवमारे हे जागेवरच कोसळले. त्यामुळे एकच खळबळ उडाली. नातेवाईकांमध्ये घबराट पसरली. सुभाष देवमारे यांना नातेवाईकांनी तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचाराआधीच सुभाष देवमारे यांचा मृत्यू झाला. डीजेचा कर्कश आवाज आणि दणदणाटामुळे वरपिता देवमारे यांचा मृत्यू झाल्याची चर्चा सुरू आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    राजकीय वाद न्यायालयात; राहुल गांधींना पुन्हा जामीन

    February 21, 2026

    दोन वाईन शॉप फोडणारा आरोपी एलसीबीच्या जाळ्यात; लाखोंचा मुद्देमाल जप्त

    February 21, 2026

    “मोठ्या लोकांचा पाठिंबा असल्यानेच धाडस?” : रोहित पवारांचा सवाल

    February 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.