Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » पहिलीच्या वर्गातील चिमुकलीवर अत्याचार ; संशयित आरोपी फरार !
    क्राईम

    पहिलीच्या वर्गातील चिमुकलीवर अत्याचार ; संशयित आरोपी फरार !

    editor deskBy editor deskDecember 31, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था

    राज्यातील अनेक शहरात अल्पवयीन मुलीसह विवाहित महिलावर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना नियमित घडत असतांना नुकतेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली असून, चक्क पहिलीच्या वर्गात शिकणाऱ्या सहा वर्षीय मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, पैठण तालुक्यातील एका गावात ही घटना घडली आहे. पहिलीच्या वर्गात शिकत असलेली अल्पवयीन मुलगी दुपारी शाळेतून घरी जात होती. यावेळी रस्त्यात या मुलीला अडवून बाळू ज्ञानोबा जाधव याने तिच्यावर अत्याचार केला. दरम्यान, मुलीने घडलेला प्रकार आईला सांगितला. त्यामुळे, पीडित मुलीच्या आईने पैठण पोलीस ठाणे गाठून या अत्याचार प्रकरणाची तक्रार दाखल केली.

    सदर घटनेनंतर आरोपी फरार झाला असून, पैठण पोलीस त्याचा शोध घेत आहेत. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी याच भागात अल्पवयीन मुलीवर दोन जणांनी अत्याचार केल्याची घटना ताजी असताना ही घटना समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. बाळू ज्ञानोबा जाधव असे या नराधमाचे नाव आहे. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळास भेट देऊन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला. मात्र, या घटनेनंतर आरोपी फरार झाला असून, पोलिसांचा पथक त्याचा शोध घेत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मध्यरात्री घरात घुसून ४८ वर्षीय महिलेचा विनयभंग !

    February 23, 2026

    राजकीय वजन वाढवण्याची शिकवण, भावनिक आठवणींचा धगधगता प्रवास ; रोहित पवार !

    February 23, 2026

    रुग्णालयात पाच दिवसाच्या नवजात मुलीला सोडून आई फरार !

    February 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.