Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » तरुणाच्या डोक्यात घातला दगड !
    क्राईम

    तरुणाच्या डोक्यात घातला दगड !

    editor deskBy editor deskDecember 27, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    गावातील भांडणाच्या कारणावरुन तरुणाशी वाद घालीत त्याच्या डोक्यात दगड घालून गंभीर जखमी केले. ही घटना मंगळवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास जिल्हा परिषद परिसरात घडली. याप्रकरणी तरुणाविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथील चेतन ज्ञानेश्वर पाटील हा तरुण नूतन मराठा महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. त्यांच्या गावातील जय सुपडू शेळके यांची म्हैस चेतन यांच्या खळ्यात शिरल्यामुळे त्यांच्यात भांडण झाले होते. मंगळवारी सकाळच्या सुमारास चेतन पाटील हा जळगावात क्लाससाठी आला होता. क्लास आटोपून चेतन हा घरी जाण्यासाठी जिल्हा परिषदजवळ आला. यावेळी जय शेळके हा त्याच्या मागे आला. यावेळी त्याने तू गावात काय मला का दादागिरी दाखवित होता. तेव्हा चेतन याने त्याला सांगितले की, मी कशाला तुला दादागिरी दाखवू असे म्हणाला. त्याचा राग आल्याने जय शेळके याने त्याला शिवीगाळ करीत चापटा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली.

    दोन जणांमध्ये भांडण सुरु असतांना जिल्हा परिषदमधील जमलेल्या लोकांनी त्यांचे भांडण सोडवित असतांना, जय शेळके यांनी जमिनिवर पडलेला दगड उचलून चेतन याच्या डोक्यात हाणला, यामध्ये चेतन गंभीर जखमी झाला. यावेळी चेतनच्या क्लासमधील हितेश पाटील, बबलू पाटील यांनी चेतन याला तात्काळ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी त्याच्यावर उपचार केल्यानंतर तो शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आला. याठिकाणी चेतन पाटील याने दिलेल्या तक्रारीवरुन्ा जय सुपडू शेळके यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    धारदार शस्त्र घेऊन दहशत माजविणारा अटकेत !

    February 13, 2026

    ऑनलाइन लोन अॅपचा कहर; वैयक्तिक माहितीचा गैरवापर

    February 13, 2026

    दिवसाढवळ्या १३ वर्षीय मुलावर चाकूहल्ल्याने खळबळ !

    February 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.