Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » महामार्गावर बसचा अपघात : २० प्रवासी जखमी !
    क्राईम

    महामार्गावर बसचा अपघात : २० प्रवासी जखमी !

    editor deskBy editor deskDecember 27, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    वापी-यावल बसला सुरत-नागपूर महामार्गावरील दहिवेलनजीकच्या बोडकीखडी गावाजवळ ब्रेक फेल झाल्याने बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात २० प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर साक्री ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहे. मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला.

    मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास सुरत- नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील दहिवेलनजीक असलेल्या बोडकीखडी गावाजवळ वापीहून यावल जाणारी एमएच २०. बीएल ३३७७ क्रमांकाच्या बसचे ब्रेक फेल झाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यामुळे बस ट्रकला धडकली.

    अपघातानंतर ट्रक चालकाने घटनास्थळी न थांबता ट्रक पळवून नेला. दहिवेल औट पोस्टवरील पोलिस कर्मचारी राजू जाधव, सागर चौधरी, दिनेश मावची घटनास्थळी पोहोचले. त्यांनी बसमधील २० जखमी प्रवाशांना उपचारार्थ तात्काळ दहिवेल प्राथमिक आरोग्य केंद्रावर दाखल केले. दहिवेल प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार केल्यानंतर प्रवाशांना अधिक उपचारासाठी साक्री ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

    अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांमध्ये रलाबाई सूर्यभान माळी (३६, रा. वार कुंडाणे, ता.धुळे), सूर्यभान फकीरा माळी (५६, रा.वार कुंडाणे), कल्पना वेच्या वसावे (२६, नेर, ता. धुळे), राजश्री गोरख चौधरी (रा. बहादरपूर ता. पारोळा), गोरख पांडुरंग चौधरी (५३, बहादरपूर ता. पारोळा), रत्नाबाई वाघ (५८, रा. वार कुंडाणे, ता. धुळे), समाधान कैलास पाटील (३७, रा. मालेगाव), जमाल खाटीक (५३, रा. धुळे), शेख गुजर (७५, रा. साक्री), सेंदा बी (६५, रा. साक्री), सुभाष दिनकर चौधरी (रा. धुळे), कल्पना सुभाष चौधरी (रा. धुळे), निर्मला यशवंत लाड (रा. नामपूर), हेमलता प्रवीण सोनार (रा. धुळे), सुयश प्रीण सोनार (रा. धुळे), मिनाबाई रामचंद्र अहिरे (रा. बोरकुंड ता. धुळे), लताबाई काळू ठाकरे (रा. बोरकुंड ता. धुळे), मनोहर भरत ठाकरे (१५) (रा. बोरकुंड), पंकज गुलाब राठोड (रा. धुळे), प्रमिला अनिल पाडवी (रा. साक्री) यांचा समावेश आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    विधान परिषद निवडणूक रंगात : महायुती विरुद्ध महाविकास आघाडी आमने-सामने; उमेदवार जाहीर !

    April 30, 2026

    पाचोऱ्यात उष्माघाताचा पहिला बळी; भाजी विक्रेत्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

    April 30, 2026

    भालगाव फाट्याजवळ भीषण अपघात; नियंत्रण सुटल्याने बसची जोरदार धडक

    April 30, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.