Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » बस जागीच झाली पलटी : शालेय विद्यार्थी जखमी !
    क्राईम

    बस जागीच झाली पलटी : शालेय विद्यार्थी जखमी !

    editor deskBy editor deskDecember 26, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अहमदनगर : वृत्तसंस्था

    राज्यातील अनेक महामार्गावर नियमित अपघाताची घटना घडत असतांना एक भीषण अपघाताची बातमी आता अहमदनगर येथून समोर आली आहे. एसटी महामंडळाच्या बसचा भीषण अपघात झालाय. बस जागीच पलटी झाल्याने यातील काही शालेय विद्यार्थी जखमी झालेत. जखमी विद्यार्थ्यांवर प्राथमिक उपचार करण्यात आलेत.

    मिळालेल्या अधिक माहितीनुसार, अहमदनगरमधील संगमनेरमध्ये ही घटना घडली आहे. प्रवाशांनी भरलेली ही बस राहुरीकडून संगमनेरकडे निघाली होती. वाटेतच बसचे एक्सेल तुटले. त्यामुळे वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे प्रवाशांनी भरलेली बस रस्त्यावर पलटी झाली. अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी न झाल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.

    संगमनेर तालुक्यातील पिंपरणे गावात बस पोहचली त्यावेळी हा अपघात झाला. सकाळची वेळ असल्याने गावातील अनेक विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी निघाले होते. बस अपघाताची (Accident) माहिती मिळताच मुलांच्या पालकांना ही माहिती कळवण्यात आली. आपल्या लेकरांच्या काळजीने आई वडिलांचा जीव कासावीस झाला होता. जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी संगमनेरला पाठवले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    रुग्णालयात पाच दिवसाच्या नवजात मुलीला सोडून आई फरार !

    February 23, 2026

    चेन्नईच्या समुद्रात जळगावचा जय बेपत्ता; कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर

    February 23, 2026

    भररस्त्यात पोलिसाला थप्पड; मद्यधुंद दांपत्याचा सिग्नलवर राडा !

    February 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.