Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » दिराकडे राहत असलेल्या पत्नीसह दोन्ही मुलांचा पतीने केला खून !
    क्राईम

    दिराकडे राहत असलेल्या पत्नीसह दोन्ही मुलांचा पतीने केला खून !

    editor deskBy editor deskDecember 23, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    ठाणे : वृत्तसंस्था

    राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारी घटना संशयाच्या कारणाने होत असतांना एक धक्कादायक घटना ठाणे शहरात घडली आहे. आपल्या पतीला दारूचे व्यसन असल्याने महिलेने दोन्ही मुलांना घेऊन आपल्या दिराकडे राहत होती. या दरम्यान पत्नी व मुलांना भेटण्यासाठी गेलेल्या पतीने पत्नीसह तिच्या दोन चिमुकल्यांची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना कासारवडवली साईनगरात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे शहरातील कासारवडवली येथे दि.२१ रोजी सकाळी भावना अमित बागडी तसेच खुशी अमित बागडी (वय ६) आणि अंकुश अमित बागडी (वय ८) अशी मृतांची नावे आहेत. मृत भावना हिचा पती अमित धर्मवीर बागडी यानेच क्रिकेटच्या बॅटने तिघांची हत्या केल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. दरम्यान अमित याला दारू पिण्याचे प्रचंड व्यसन असल्या कारणाने भावना ही त्याला सोडून दीर विकास बागडीसोबत काही दिवसांपासून राहत होती.

    पत्नी राहत असलेल्या ठिकाणी तीन दिवसापासून आरोपी अमित हा पत्नी आणि दोन मुले यांना भेटण्यासाठी म्हणून आला होता. दरम्यान आज सकाळी अमितचा भाऊ विकास बागडी हा नेहमीप्रमाणे सात वाजता त्याच्या हाउसकीपिंगच्या कामासाठी गेला. त्यानंतर साधारण साडेअकराच्या सुमारास तो घरी परतला असता त्याला घरात भावना व दोन्ही मुले हे मृतावस्थेत आढळून आले. त्यांच्या डोक्याजवळ क्रिकेटची बॅट दिसून आली. यानंतर पोलिसांना घटनेबाबत माहिती देण्यात आली.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अपघाताने उध्वस्त झाले प्रेमाचे स्वप्न; नववधू-वर जागीच ठार

    February 22, 2026

    जळगावच्या ७८३ ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंच प्रशासक !

    February 22, 2026

    विद्यापीठ व महाविद्यालयात दर्जेदार प्राध्यापकांसाठी मोठी भरती मोहीम

    February 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.