Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मौजमजेसाठी चक्क चोरली कार ; अल्पवयीन मुलगा पोलिसांच्या ताब्यात !
    क्राईम

    मौजमजेसाठी चक्क चोरली कार ; अल्पवयीन मुलगा पोलिसांच्या ताब्यात !

    editor deskBy editor deskDecember 19, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नागपूर : वृत्तसंस्था

    देशभरातील अनेक तरुण सोशल मिडीयाच्या माध्यमातून अनेक गुन्हेगारी जगतामध्ये पाय रोवत आहे. नुकतेच मौजमजेसाठी चक्क कार आणि दुचाकी चोरून त्यावर ‘स्टाईल’ मारणाऱ्या एका अल्पवयीन आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक एकच्या पथकाने ही कारवाई केली.

    मिळालेल्या माहितीनुसार, बजाजनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रचना अपार्टमेंट येथून स्वप्निल शेंडे (वय ३८) यांच्या मालकीची मारुती व्हॅन १६ डिसेंबर रोजी घराच्या पार्किंगजवळून चोरी झाली. शेंडे यांच्या तक्रारीवरून बजाजनगर पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक एकच्या पथकाकडूनदेखील समांतर तपास सुरू होता. सीसीटीव्ही तसेच खबऱ्यांच्या नेटवर्कच्या माध्यमातून यात १६ वर्षीय अल्पवयीन मुलाचा समावेश असल्याची बाब समोर आली.

    पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. विचारणा केली असता, त्याने कार चोरल्याची कबुली दिली. तसेच २९ नोव्हेंबर रोजी रात्री प्रतापनगरातील कामगार कॉलनीतून यश बन्सोड याची दुचाकीदेखील चोरल्याची माहिती दिली. त्याच्यावर याअगोदरदेखील दोन वाहनचोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्याच्या कुटुंबात आई आणि भावंडं आहेत. आई घरकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. अल्पवयीन मुलाला नवीन वाहनाने रस्त्यावर फिरण्याची आवड आहे. यामुळे तो वाहन चोरतो. शेंडे यांची व्हॅन चोरून फिरायला नेल्यानंतर त्याने ती लपवून ठेवली. पोलिस निरीक्षक सुहास चौधरी, राजेंद्र गुप्ता, नितीन वासनिक, योगेश शेलोकार, सोनू भावरे, रितेश तुमडाम, योगेश वासनिक, स्वप्निल खोडके यांच्या पथकाने ही कारवाई केली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अपघाताने उध्वस्त झाले प्रेमाचे स्वप्न; नववधू-वर जागीच ठार

    February 22, 2026

    जळगावच्या ७८३ ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंच प्रशासक !

    February 22, 2026

    विद्यापीठ व महाविद्यालयात दर्जेदार प्राध्यापकांसाठी मोठी भरती मोहीम

    February 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.