Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » विरोधात केस लढत असल्याने महिला वकिलावर हल्ला !
    क्राईम

    विरोधात केस लढत असल्याने महिला वकिलावर हल्ला !

    editor deskBy editor deskDecember 16, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भंडारा : वृत्तसंस्था

    राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारी घटना सातत्याने घडत असतांना नुकतेच भंडारा शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घटस्फोटाच्या खटल्यात पत्नीची बाजू मांडणाऱ्या महिला वकिलावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात सरिता माकडे या जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

    मिळालेल्या माहितीनुसार, यातील संशयित आरोपीचे नाव महेश डोकरिमारे असे असून माझ्याविरुद्ध ते केस का लढत आहेस, असा जाब विचारून त्याने वकील सरिता माकडे यांच्यावर हल्ला केला. भंडारा जिल्हा सत्र न्यायालयात सरिता या वकील म्हणून कार्यरत आहेत. आरोपी महेश याच्याविरुद्ध घटस्फोटाचं प्रकरण सुरू आहे. सरिता या त्याच्या पत्नीच्या बाजूने युक्तिवाद करत आहेत. याच रागातून आरोपीने हा हल्ला केला. आरोपी महेश याने वकील सरिता यांच्यावर आज सकाळी चाकूने हल्ला केला. यात त्या जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेचा जिल्ह्यातील वकील संघटनेने निषेध केला आहे. आरोपीला तात्काळ अटक करावी, अशी मागणी करण्यात आली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जुन्या घरगुती वादातून तरुणावर कुऱ्हाडीसह विळ्याने वार !

    April 23, 2026

    चुंचाळेत बेकायदेशीर बियाणे विक्री उघड; एक आरोपी गजाआड

    April 23, 2026

    रुद्राक्षाचा चमत्कार दाखवत वृद्धाला लुबाडले;भोंदूंची जळगाव बसस्थानकात करामत

    April 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.