Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » परिवाराला मारहाण करीत लाखोंचे दागिने घेवून दरोडेखोर पसार !
    क्राईम

    परिवाराला मारहाण करीत लाखोंचे दागिने घेवून दरोडेखोर पसार !

    editor deskBy editor deskDecember 16, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    बुलढाणा : वृत्तसंस्था

    राज्यातील अनेक शहरात चोरी व दरोड्याच्या अनेक घटना घडत असतांना नुकतेच बुलढाणा जिल्ह्यातून देखील अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मोताळा तालुक्यातील वाघजाळ या गावात सशस्त्र दरोडा पडला असून पती, पत्नीसह मुलाला मारहाण करत 2 लाखाचे सोने व 20 हजार रोख रक्कम घेऊन दरोडेखोर पसार झाले आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, मोताळा तालुक्यातील वाघजाळ गावात शनिवारी मध्यरात्री सशस्त्र दरोडा पडल्याची घटना घडली. दरोडेखोरांनी पती, पत्नीसह मुलाला मारहाण करत 2 लाखाचे सोने व 20 हजारांचा ऐवज लुटला. मारहाणीमध्ये कुटुंबातील चौघेही गंभीर जखमी झाले आहेत. या भयंकर घटनेने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस फौजफाटा गावात दाखल झाला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. पोलीस स्टेशनच्या जवळच असलेल्या गावात दरोडा पडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जुन्या घरगुती वादातून तरुणावर कुऱ्हाडीसह विळ्याने वार !

    April 23, 2026

    चुंचाळेत बेकायदेशीर बियाणे विक्री उघड; एक आरोपी गजाआड

    April 23, 2026

    रुद्राक्षाचा चमत्कार दाखवत वृद्धाला लुबाडले;भोंदूंची जळगाव बसस्थानकात करामत

    April 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.