Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » नराधम बाप करीत होता सहा वर्षापासून मुलीवर अत्याचार !
    क्राईम

    नराधम बाप करीत होता सहा वर्षापासून मुलीवर अत्याचार !

    editor deskBy editor deskDecember 14, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    राज्यातील मुंबई शहरात अनेक गुन्हेगारी घटना घडत असतांना अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटना देखील कमी होत नसल्याचे दिसत आहे. नुकतेच १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर जन्मदात्या पित्यानेच लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. मागील सहा वर्षांपासून हा नराधम बाप आपल्या मुलीवर अत्याचार करत होता. मुलीच्या तक्रारीवरून बुधवारी पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, मुलीच्या पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, तिचे वडील 2017 पासून तिचा विनयभंग करत होते. मात्र भीतीपोटी तिने लैंगिक छळाची माहिती कोणालाही दिली नव्हती. सोमवारीही आरोपीने तिच्यावर अत्याचार केला. मात्र त्यानंतर आरोपी पित्याने मुलीला तिच्या मोबाईल नंबरवर तिचे विवस्त्र व्हिडिओ पाठवण्यास सांगितले. यावर मुलीने आक्षेप घेतला. यावरुन संतापलेल्या बापाने तिला मारहाण केली.

    यानंतर मुलीच्या आईने मुलीला मारहाणीचं कारण विचारलं. त्यानंतर मुलीने सर्व घडलेला प्रकार आईला सांगितला. मुलीवरील आपबिती ऐकून आईच्या जबर मानसिक धक्का बसला. मात्र आईने न घाबरला मुलीसह पोलिसात जाऊन याबाबत तक्रार दाखल केली. पोलिसांनी देखील तक्रारीची दखल घेत वडिलांना ताब्यात घेतलं. पोलिसांनी मुलीच्या तक्रारीवरुन आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम 354, 354A आणि 354B आणि POCSO कायद्यानुसार पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे. लवकरच पीडित मुलीचा जबाब नोंदवला जाणार आहे. पुढील तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अपघाताने उध्वस्त झाले प्रेमाचे स्वप्न; नववधू-वर जागीच ठार

    February 22, 2026

    जळगावच्या ७८३ ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंच प्रशासक !

    February 22, 2026

    विद्यापीठ व महाविद्यालयात दर्जेदार प्राध्यापकांसाठी मोठी भरती मोहीम

    February 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.