Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » एमआयएम हा पक्ष भाजपला मदत करतो : आ.पवारांचा हल्लाबोल !
    राजकारण

    एमआयएम हा पक्ष भाजपला मदत करतो : आ.पवारांचा हल्लाबोल !

    editor deskBy editor deskDecember 10, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    राज्याचे हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नवाब मलिक यांच्यामुळे वातावरण तापले होते तर आता आ.रोहित पवारांनी केलेल्या आरोपांमुळे देखील वातावरण तापल्याचे दिसत आहे.

    राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार म्हणाले कि, एमआयएम पक्ष हा भाजपकडून पैसे घेऊन निवडणुकीत आपले उमेदवार उभे करतो. तसेच, महाविकास आघाडीचे उमेदवार पाडण्यास एमआयएम भाजपला मदत करतो असा गंभीर आरोप देखील त्यांनी केला आहे.
    दरम्यान रोहित पवाार पुढे बोलताना म्हणाले की, प्रकाश आंबेडकर हे संविधान वाचवण्याची भाषा करतात, 2019 मध्ये वंचित आघाडीने त्यांनी उमेदवार उभे केल्याने आमचे अनेक उमेदवार पडले. आमचा पण संविधान वाचवण्याचा उद्देश आहे.

    त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी खबरदारी घ्यावी, असा सल्ला त्यांनी आंबेडकर यांना दिला आहे. आमदार पवार म्हणाले की, प्रफुल्ल पटेल यांनी अजित पवारांना भाजपसोबत एकत्रित आणण्यासाठी प्रयत्न केल्याने त्यांच्यावर कारवाई होत नाही का?. पटेल यांच्यावर देखील गंभीर आरोप आहेत, असे म्हणत सवाल उपस्थित केला आहे. तर अजित पवार यांना विरोधी पक्षनेते बनवण्यासाठी राष्ट्रवादीच्या सर्वच आमदारांनी पत्रावर सह्या केल्या होत्या. मात्र, त्या पत्रात नेमके काय लिहले आहे, याबाबत कोणीही विचारणा केली नव्हती. त्यामुळे तेच पत्र चोरून सत्तास्थापने त्या पत्राचा अजित पवार गटाने दुरुपयोग केल्याचा दावा देखील पवारांनी केला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अपघाताने उध्वस्त झाले प्रेमाचे स्वप्न; नववधू-वर जागीच ठार

    February 22, 2026

    जळगावच्या ७८३ ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंच प्रशासक !

    February 22, 2026

    विद्यापीठ व महाविद्यालयात दर्जेदार प्राध्यापकांसाठी मोठी भरती मोहीम

    February 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.