Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » आम्ही दादागिरीनेच उत्तर देऊ : मंत्री भुजबळ यांचा इशारा !
    क्राईम

    आम्ही दादागिरीनेच उत्तर देऊ : मंत्री भुजबळ यांचा इशारा !

    editor deskBy editor deskDecember 10, 2023No Comments3 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पुणे : वृत्तसंस्था

    मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसीच्या मेळाव्यातून मनोज जरांगे पाटील यांच्यावर घणाघाती हल्ला चढवला. यापुढे तुम्ही दादागिरी केली तर आम्ही तुला दादागिरीनेच उत्तर देऊ, असा इशाराच छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांनी दिला. तसेच यावेळी भुजबळ यांनी पोलिसांनाही सावध राहण्याचा सल्ला दिला. तुम्ही कारवाई का करत नाही. उद्या प्रकरण हाताबाहेर गेले तर तुम्ही हातात बंदुका घेऊन केवळ बघ्याची भूमिका घेणार आहात का?, असा सवाल छगन भुजबळ यांनी केला.

    इंदापूरमध्ये ओबीसी एल्गार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. मी काही बोललो तर अनेक विचारवंत बोलायला लागतात. महाराष्ट्रात अशांततेचे वातावरण पसवरले जाते. दोन जातीत भांडणे लावली जात असल्याचे सांगण्यात येते. ते जरांगे १५ दिवसांपासून फिरत आहेत. सकाळपासून त्याची मिटिंग सुरू होते. आपली मिटिंग रात्री १० वाजता बंद होते. त्यांची मिटिंग रात्री १२ ला, रात्री १ ला, रात्री दोनला. त्यांना परवानगी आहे की नाही माहीत नाही. पोलीसही कारवाई करत नाही. ते म्हणेल तो कायदा. कायदा फक्त तुम्हाला आणि आम्हाला? त्यांनी काही बोललं तरी त्याच्या बातम्या येणार. आपण गप्प बसणार. १५ दिवसाने काही बोलले की त्यांचे लगेच सुरू. मी फक्त १५ दिवसाने बोलतो. पण एक सौ सुनार की एक लोहार की. त्यामुळे थोडे बोलावे लागते. सर्वच ऐकून घेण्याची आम्हाला सवय नाही. इथे कुणालाच नाही, असे छगन भुजबळ  म्हणाले.

    मला सांगा या राज्यात अशांतता कोण माजवत आहे? आम्ही माजवतोय? छगन भुजबळ म्हणाले का तलवारी घेऊ, कुऱ्हाडी घेऊ? ते यवतमाळला म्हणाले. २४ तारखे नंतर तुझा हिशोब करतो. तुला दाखवतो. हे कायसुरु आहे? मराठा समाजाला विरोध नाही. आमचा विरोध दादागिरी आणि झुंडशाहीला आहे. दादागिरी सुरू राहिली तर दादागिरीला दादागिरीनेच उत्तर देऊ. आमच्यावर जबाबदारी आहे. नंतर बोलू नका अशांतता पसरवली. त्यांना सांगा बोलताना नीट बोला. पोलिसांवरील हल्ले थांबवा, असा इशाराच छगन भुजबळ यांनी दिला.

    राज्यात अशांतता करतंय कोण? राज्यात शांतता असेल तर उद्योग धंदे येतील, बेरोजगारी दूर होईल. राज्यातील उद्योगधंदा वाढेल हे मान्य. पण अशांतता निर्माण करतं कोण? याचा विचार करण्याची गरज आहे. पोलिसांना सांगायचं तुम्ही वेळेवर ॲक्शन घेतली नाही तर पुढे तुम्ही काहीच करू शकणार नाही. ते अशांतता माजवतील. तेव्हा तुम्ही काय करणार? केवळ रिव्हॉल्वर घेऊन तुम्ही बघ्याची भूमिका घेणार का? असा सवाल त्यांनी पोलिसांना केला.
    यावेळी छगन भुजबळांनी मनोज जरांगे पाटील यांची एक ऑडिओ क्लिप ऐकवली. त्यानंतर त्यांनी जरांगेंची नक्कल करत खिल्ली उडवली. मनोज जरांगे यांनी आमदार नारायण कुचे यांच्या शारीरिक व्यंगावर टीका केली. कुणाच्या शारीरिक व्यंगावर टीका करणे अशोभनीय आहे. आपण दिव्यांग म्हणतो. ते काय म्हणाले ते मी वाचून दाखवतो, असे छगन भुजबळ म्हणाले. यावेळी छगन भुजबळ मनोज जरांगे यांच्या हिंदी भाषेत केलेल्या वक्तव्यावर टीका करतात. “तू डोक्याने दिव्यांग झालाय, तुला हिंदीसुद्धा येत नाही, अशी टीका छगन भुजबळ यांनी केली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अपघाताने उध्वस्त झाले प्रेमाचे स्वप्न; नववधू-वर जागीच ठार

    February 22, 2026

    जळगावच्या ७८३ ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंच प्रशासक !

    February 22, 2026

    विद्यापीठ व महाविद्यालयात दर्जेदार प्राध्यापकांसाठी मोठी भरती मोहीम

    February 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.