Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धरणगाव बसस्थानकावर महिलेचे दागिने लंपास !
    क्राईम

    धरणगाव बसस्थानकावर महिलेचे दागिने लंपास !

    editor deskBy editor deskDecember 9, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव : प्रतिनिधी

    बसमधील गर्दीचा फायदा घेत दोन अज्ञात महिलांनी महिलेच्या पर्समध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने आणि चार हजारांची रोख रक्कम असा ४० हजारांचा ऐवज लांबवला. ही घटना गुरुवारी दुपारी धरणगाव बसस्थानकात घडली. याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून धरणगाव पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, शहादा तालुक्यातील कुकावल येथील रहिवासी भारती जालिंदर पाटील (वय ४०) या गुरुवारी कुकावल येथे जाण्यासाठी धरणगाव बसस्थानकात आल्या. जळगाव- अंकलेश्वर जाणाऱ्या बसमध्ये चढत असतांना दोन अज्ञात महिलांनी त्यांच्या पर्समधील २१ हजार रुपये किमतीचे सात ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र, १५ हजार रुपये किमतीचे पाच ग्रॅम वजनाचे दागिने आणि ४ हजाराची रोकड असा ऐवज लंपास केला.

    चोपडा बसस्थानक आल्यानंतर भारती पाटील यांच्या चोरीचा प्रकार लक्षात आला. यावेळी बस कंडक्टरने धरणगाव बसस्थानकात गर्दी होती, त्यावेळी दोन संशयित महिला दिसल्याचे सांगितले. त्यामुळे भारती पाटील यांनी तत्काळ धरणगाव पोलिस स्थानक गाठत तक्रार नोंदवली. पुढील तपास नाईक उमेश पाटील करीत आहेत. महिलांचे दागिने लांबविण्याच्या घटना घडत असून पोलिसांनी दखल घेण्याची मागणी होत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मैं डंडा लेके बैठा हूँ! गडकरींचा पेट्रोलियम लॉबीवर थेट इशारा

    March 6, 2026

    वऱ्हाडींच्या गर्दीत चोरट्यांचा डाव; नववधूचे दागिने चोरून मध्यप्रदेशात पळाले, दोघांना बेड्या

    March 6, 2026

    धक्कादायक : तरुणीचा तोल गेल्याने विहिरीत पडून मृत्यू !

    March 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.