Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावात मनोज जरांगे पाटलांची धडाडणार तोफ ; ‘या’ दिवशी होणार सभा !
    जळगाव

    जळगावात मनोज जरांगे पाटलांची धडाडणार तोफ ; ‘या’ दिवशी होणार सभा !

    editor deskBy editor deskNovember 27, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांचा राज्यात दौरे सुरू असून खानदेश दौऱ्यामध्ये जळगाव शहरात ४ डिसेंबर रोजी सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सभेच्या नियोजनासाठी व तारीख निश्चित करण्यासाठी आज जळगाव जिल्ह्यातील सकल मराठा समाजाचा पदाधिकारी यांनी छत्रपती संभाजीनगर येथे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन सभेचे नियोजन करण्यात आले.

    जळगाव जिल्हा सकल मराठा समाजातर्फे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांच्या सभेच्या आयोजनाबाबत जळगाव येथे रविवारी सकाळी साडेदहा वाजता पद्मालय रेस्ट हाऊस येथे समाजाची बैठक घेण्यात आली. यावेळी बैठकीत आयोजन व स्थळाबाबत चर्चा करण्यात आली. सभेची तारीख निश्चित नसल्याने तारीख निश्चित करण्याबाबत सकल मराठा समाज जळगाव जिल्ह्यातील समाज बांधवांनी छत्रपती संभाजीनगर येथे उपचारासाठी दाखल असलेले मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी ४ डिसेंबर रोजी जळगाव येथे सभा घेण्याचे तरंगे पाटील यांनी सांगितले. सर्व समाज बांधवांनी जोमाने सभेच्या तयारीला लागण्याचे आवाहन केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अपघाताने उध्वस्त झाले प्रेमाचे स्वप्न; नववधू-वर जागीच ठार

    February 22, 2026

    जळगावच्या ७८३ ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंच प्रशासक !

    February 22, 2026

    विद्यापीठ व महाविद्यालयात दर्जेदार प्राध्यापकांसाठी मोठी भरती मोहीम

    February 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.