Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » राष्ट्रीय महामार्गावर वाहतूकीचा खोळंबा थांबता थांबेना; रस्त्यावर कंटेनर अडकल्याने वाहतूक थप्प
    जळगाव

    राष्ट्रीय महामार्गावर वाहतूकीचा खोळंबा थांबता थांबेना; रस्त्यावर कंटेनर अडकल्याने वाहतूक थप्प

    टीम लाईव्ह महाराष्ट्रBy टीम लाईव्ह महाराष्ट्रDecember 6, 2021No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव प्रतिनिधी । बांभोरी पुलाजवळ सकाळच्या घटनेनंतर आज दुपारी पुन्हा त्याच ठिकाणी कंटेनर अडकल्याने गेल्या दोन तासांपासून वाहतूकीचा खोळंबा झाला आहे. यावेळी दोन्ही बाजूची वाहतूक पुन्हा थप्प झाली असून वाहनधारकांना मनस्ताप करावा लागत आहे.

    जळगाव येथून जवळ आलेल्या बांभोरी पुलाजवळ आज सकाळी १२ वाजेच्या सुमारास वाळूचे ट्रक्टरचे चाक निखळल्याने राष्ट्रीय महामार्गावर ट्रक्टर बंद पडले होते. यावेळी अर्धा तास दोन्ही बाजूने असलेली वाहतूक थप्प झाली होती. शहर वाहतूक शाखा आणि तालुका पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेवून ट्रक्टर बाजूल करून रस्ता मोकळा केला होता. ही घटना घडल्यानंतर पुन्हा दुपारी ४ वाजेच्या सुमारास हॉटेल मराठा मटन समोर महामार्गावर पुन्हा कंटेनर अडकले होते. त्यामुळे गेल्या एक तासापासून वाहतूकीचा खोळंबा झाला. यावेळी जळगाहून मुंबईकडे जाणारी रूग्णावाहिका अडकून होती. नागरीकांच्या मदतीने रूग्णवाहिका माघारी फिरून दुसऱ्या मार्गाने मुंबईकडे रवाना झाली. परंतू वारंवार होणाऱ्या घटनामुळे वाहनधारकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    टीम लाईव्ह महाराष्ट्र
    • Website

    Related Posts

    नवीन बायपासवर पहाटेचा भीषण अपघात; सेवानिवृत्त रेल्वे कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू

    March 2, 2026

    पाणी भरण्याचा प्रयत्न ठरला जीवघेणा; विजेच्या धक्क्याने १४ वर्षीय धिरजचा मृत्यू

    March 2, 2026

    “सर्वोच्च न्यायालयाच्या अटक वॉरंट”ची धमकी; १८ लाखांची सायबर लूट !

    March 2, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.