Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » खासगी बसचा भीषण अपघात : तीन प्रवासी जागीच ठार !
    क्राईम

    खासगी बसचा भीषण अपघात : तीन प्रवासी जागीच ठार !

    editor deskBy editor deskNovember 23, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    कोल्हापूर : वृत्तसंस्था

    कोल्हापूरच्या पुईखडी येथे एका खासगी ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात बुधवारी मध्यरात्री झाल असून गोव्यावरून मुंबईला जाणारी बस कोल्हापूर शहराजवळच्या पुईखडी येथे उलटली. या अपघातात एकाच कुटुंबातील तीन सदस्यांचा मृत्यू झाला आहे. तर चौघेजण जखमी झाले आहेत. ही बस बुधवारी रात्री आठ वाजता गोव्यावरून निघाली होती. मध्यरात्री दोन वाजता बस कोल्हापूरच्या पुईखडी येथे पोहोचली असता ही बस उलटली.

    मिळालेल्या माहितीनुसार, व्हीआरएल कंपनीची मुंबईला जाणारी खाजगी स्लीपर कोच बस बुधवारी रात्री आठ वाजता गोव्यातील पणजी येथून निघाली. गुरुवारी पहाटे दोनच्या सुमारास कोल्हापूर शहराजवळ पुईखडी येथे भरधाव बस उलटली. अपघाताची माहिती मिळताच कोल्हापूर महानगरपालिकेचे अग्निशमन दलाचे जवान, मुख्य अग्निशमन अधिकारी आणि करवीर पोलिस घटनास्थळी पोहोचले. या अपघातात तीन जण ठार झाले आहेत. या बसमध्ये जवळपास २५ प्रवासी होते. बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. तर चार प्रवासी बसखाली अडकले होते, त्यांनादेखील बाहेर काढलं. तर १६ प्रवाशी सुखरूप आहेत. या अपघातात नीलू गौतम (४३), रिद्धिमा गौतम (१७) आणि सार्थक गौतम (१३) या तिघांचा मृत्यू झाला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अपघाताने उध्वस्त झाले प्रेमाचे स्वप्न; नववधू-वर जागीच ठार

    February 22, 2026

    जळगावच्या ७८३ ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंच प्रशासक !

    February 22, 2026

    विद्यापीठ व महाविद्यालयात दर्जेदार प्राध्यापकांसाठी मोठी भरती मोहीम

    February 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.