Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » ६० वर्षीय वृद्धाने केला महिलेचा विनयभंग !
    क्राईम

    ६० वर्षीय वृद्धाने केला महिलेचा विनयभंग !

    editor deskBy editor deskNovember 20, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पुणे : वृत्तसंस्था

    पुणे शहरात अनेक तरुणीसह अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटना घडत असतांना एका महिलेला रेशनचा तांदूळ देण्याच्या बहाण्याने विश्रांतवाडी येथील गोडाऊनमध्ये नेऊन तिच्यासमोर अश्लील वर्तन करुन विनयभंग केल्याची घटना घडली आहे. ही घटना शुक्रवारी दि.१७ सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास विश्रांतवाडी येथील पोरावाल रोडवरील गोडाऊनमध्ये घडली आहे. याबाबत खडकी येथे राहणाऱ्या 45 वर्षाच्या महिलेने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरून गोविंदसिंग रंधवा (वय-60 रा. संगमवाडी झोपडपट्टी) याच्यावर आयपीसी 354 अ, 342 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

    दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपीने फिर्यादी यांना लॅबरॉडर श्वानासाठी रेशनचा तांदूळ देतो असे सांगून त्याच्या दुचाकीवरुन विश्रांतवाडी येथील पोरवाल रोडवरील गोडाऊन मध्ये नेले. त्याठिकाणी अंगावरील कपडे काढत अश्लील बोलून विनयभंग केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. याबाबत महिलेने तक्रार देताच विश्रांतवाडी पोलिसांनी आरोपीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक चौधरी करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अपघाताने उध्वस्त झाले प्रेमाचे स्वप्न; नववधू-वर जागीच ठार

    February 22, 2026

    जळगावच्या ७८३ ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंच प्रशासक !

    February 22, 2026

    विद्यापीठ व महाविद्यालयात दर्जेदार प्राध्यापकांसाठी मोठी भरती मोहीम

    February 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.