Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मनोज जरांगे पाटलांचा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर गंभीर आरोप
    राजकारण

    मनोज जरांगे पाटलांचा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर गंभीर आरोप

    editor deskBy editor deskNovember 18, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    राज्यात मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील हे राज्यभर दौरे सुरु असतांना त्यांनी नुकतेच इस्लामपूर येथील सभेत राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यावर गंभीर आरोप केलेत. छगन भुजबळ यांनी केलेली वक्तव्ये पाहता त्याना राज्यात दंगली घडवून आणायच्या आहेत असा आरोप केला. छगन भुजबळ यांना राज्यात दंगली घडवायच्या आहेत. मराठा-ओबीसीनी एकमेकांच्या अंगावर जाऊ नये, ही राजकीय मंडळी आपल्यात झुंज लाऊ शकतात. त्यामुळे सावध राहा असे आवाहनही जरांगे पाटील यांनी यावेळी केले आहे.

    मनोज जरांगे म्हणाले, भुजबळ यांना मुख्यमंत्री व्हायचंय म्हणून जातीय दंगली करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळावरून अपेक्षा करतो की आत्ताचे मुख्यमंत्री लवकरात लवकर आरक्षण देतील टाईम बॉण्ड ही देतील. शिवाय मंत्री छगन भुजबळ यांना समजूनही सांगतील. उशिरा का होईना पाप बाहेर आले आहे. दंगली घडवण्यासाठी वक्तव्य सुरु आहेत. वैचारिक विचार मांडले पाहिजे. तो माणून ओबीसीसह मराठा समाजाच्या मनातून उतरला आहे.

    यशवंतराव चव्हाणांचा आमच्यावर प्रभाव आहे .मराठ्यांच्या लेकरांना आरक्षण आम्ही मागितलं तर ते म्हणतात आमची मुलं गुरु ढोरं आहेत का? ओबीसी लेकांरांचा भुजबळांनी अपमान केला आहे. हा माणूस राज्याच्या शांततेसाठी चांगला नाही. आम्ही राज्यात शांतता राखू .आपल्यात झुंज लावून राजकिय फायदा घेतील. त्यामुळे दोन्ही समाजांनी सावध राहा, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अपघाताने उध्वस्त झाले प्रेमाचे स्वप्न; नववधू-वर जागीच ठार

    February 22, 2026

    जळगावच्या ७८३ ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंच प्रशासक !

    February 22, 2026

    विद्यापीठ व महाविद्यालयात दर्जेदार प्राध्यापकांसाठी मोठी भरती मोहीम

    February 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.