जळगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील वसंतवाडी येथे स्व भागचंद चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त स्तुत्य उप्रकम
जळगाव तालुक्यातील वसंतवाडी येथील माजी सरपंच स्व.भागचंद चव्हाण यांच्या १० व्या पुण्यतिथीनिमित्त ज्ञानेश्वर चव्हाण जळगाव तालुका शिवसेना समन्वयक यांनी वसंतवाडी वार्ड क्रमांक ३ तांडा येथील नागरिकांना आयुष्यमान गोल्डन कार्ड व डिजीटल रेशनकार्डचे मोफत वाटप केले.
या कार्यक्रमाला जळके वि.का.सोसायटीचे माजी चेअरमन प्रविण पाटील, वसंतवाडी माजी उपसरपंच गजमल पवार, माजी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष भास्कर सोनार ,वि.का.सोसायटी संचालक शांताराम राखुंडे जेष्ठ नागरिक बळीराम चव्हाण, रामदास चव्हाण,झामु चव्हाण प्रल्हाद चव्हाण , चंद्रदास चव्हाण,विलास चव्हाण शालेय शिक्षण समितीचे उपाध्यक्ष भुरा चव्हाण , मोहन चव्हाण,आशा सेविका गोजर पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने महीला व ग्रामस्थ उपस्थित होते.
या कार्यक्रमाला जळके ई सेवा केंद्राचे संचालक ईश्वर चिमणकारे व राहुल चोपडे यांचे सहकार्य लाभले या ठिकाणी एकुण ११४ लाभार्थ्यांनी लाभ घेतला त्यांना मान्यवरांच्या हस्ते आयुष्यमान गोल्डन कार्ड व डिजीटल रेशनकार्डचे वाटप करण्यात आले



