Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धक्कादायक : रात्रीच्या सुमारास पोलीस कॉन्स्टेबलने गोळी झाडून संपविले आयुष्य !
    क्राईम

    धक्कादायक : रात्रीच्या सुमारास पोलीस कॉन्स्टेबलने गोळी झाडून संपविले आयुष्य !

    editor deskBy editor deskNovember 15, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    सोलापूर : वृत्तसंस्था

    शहरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सोलापूर शहर पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका पोलीस कॉन्स्टेबलने केशव नगर पोलीस वसाहतीत रायफलने स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली आहे. राहुल शिरसाठ (वय ३५) असं पोलिस कॉन्स्टेबलचे नाव आहे.

    आज सकाळी भाऊबीजेच्या दिवशी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास राहुल यांनी आत्महत्या केली आहे. राहुल शिरसाठ हे पोलिस आयुक्त यांच्या बंगल्यावर गार्ड म्हणून कार्यरत होते, अशी माहिती मिळत आहे.

    सोलापूर शहर पोलिस दलातील एका पोलिस कॉन्स्टेबलने आत्महत्या केल्याने सोलापूर पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच सदर बाजार पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. डॉक्टरांनी राहुल शिरसट यांना मृत घोषित केले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अपघाताने उध्वस्त झाले प्रेमाचे स्वप्न; नववधू-वर जागीच ठार

    February 22, 2026

    जळगावच्या ७८३ ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंच प्रशासक !

    February 22, 2026

    विद्यापीठ व महाविद्यालयात दर्जेदार प्राध्यापकांसाठी मोठी भरती मोहीम

    February 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.