Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » दिवाळीच्या दिवशी मारेकऱ्यांनी तीन मुलासह आईला संपविले !
    क्राईम

    दिवाळीच्या दिवशी मारेकऱ्यांनी तीन मुलासह आईला संपविले !

    editor deskBy editor deskNovember 13, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नवी दिल्ली : वृत्तसंस्था

    देशभर दिवाळीची धामधूम सुरु असतांना गुन्हेगारी घटना घडत उघडकीस येत आहे. अशाच एका घटनेने कर्नाटकमध्ये खळबळ माजली आहे. कर्नाटकच्या उडुपी जिल्ह्यात आई आणि ३ मुलांसह एकाच घरातील चौघांची हत्या करण्यात आली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यात एका महिलेची आणि तिच्या तीन मुलांची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याने खळबळ उडालीय. रविवारी १३ नोव्हेंबर रोजी ही धक्कादायक घटना घडली. मारेकऱ्याने आधी महिला आणि तिच्या दोन मोठ्या मुलांची हत्या केली. तेवढ्यात महिलेचा 12 वर्षांचा धाकटा मुलगा आत आला.
    मारेकऱ्याने त्याला पाहताच त्याच्यावर हल्ला करून निष्पाप बालकाचाही चाकूने वार करून खून केला.

    मृताच्या शेजाऱ्याला आवाज आल्याने ते धाऊन गेले मात्र मारेकऱ्याने त्यालाही धमकावले. मारेकऱ्यांनी महिलेच्या सासूवरही चाकू हल्ला केला ज्यामध्ये त्या गंभीर जखमी झाल्या. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, शेजाऱ्यांनी याबाबतची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत सर्व मृतदेह ताब्यात घेतले आहेत. प्राथमिक तपासात हे हत्याकांड पुर्व वैमनस्यातून झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. घरामध्ये कोणतीही चोरी झाली नाही किंवा कोणत्याही वस्तूला मारेकऱ्यांनी हात लावला नाही, त्यामुळे हे हत्याकांड वैयक्तिक कारणामुळे झाल्याची शक्यता उडुपीच्या जिल्हा अधिक्षकांनी वर्तवली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अपघाताने उध्वस्त झाले प्रेमाचे स्वप्न; नववधू-वर जागीच ठार

    February 22, 2026

    जळगावच्या ७८३ ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंच प्रशासक !

    February 22, 2026

    विद्यापीठ व महाविद्यालयात दर्जेदार प्राध्यापकांसाठी मोठी भरती मोहीम

    February 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.