Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » रोटावेटरमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्देवी मृत्यू !
    क्राईम

    रोटावेटरमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्देवी मृत्यू !

    editor deskBy editor deskNovember 9, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मालेगाव : वृत्तसंस्था

    मालेगाव जवळील वाशीम येथे तुरीच्या शेतात काम करताना शेतकऱ्याचा रोटावेटरमध्ये अडकून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना आज ८ नोव्हेंबर रोजी दुपारी घडली. राजेश भिमराव सौभागे (३५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील सौभागे कुटुंबीय ज्ञानेश्वर वाढणकर यांच्या मालेगाव शेतशिवारातील शेत मक्त्याने करतात. दरम्यान, या शेतातील तुरीमध्ये रोटावेटर फिरविण्यासाठी त्यांनी एम. एच. ३७ एडी – ४९९८ या क्रमांकाचे ट्रॅक्टर बोलाविले. यावेळी चालक अंकुश चवरे हा ट्रॅक्टर चालवित असताना राजेश हा ट्रॅक्टरवर बसलेला होता. अचानक त्याचा तोल जाऊन राजेश ट्रॅक्टरवरून कोसळून रोटावेटरमध्ये अडकला आणि यातच त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर ट्रॅक्टर चालक अंकुश हा घटनास्थळावरून पळून गेला. अशा आशयाची फिर्याद मृतकाचा भाऊ मदन भिमराव सौभागे यांनी पोलिसात दिली. त्यानुसार पोलिसांनी तत्परतेने घटनास्थळ गाठून पंचनाम्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. याप्रकरणी ट्रॅक्टर चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अपघाताने उध्वस्त झाले प्रेमाचे स्वप्न; नववधू-वर जागीच ठार

    February 22, 2026

    जळगावच्या ७८३ ग्रामपंचायतींवर विद्यमान सरपंच प्रशासक !

    February 22, 2026

    विद्यापीठ व महाविद्यालयात दर्जेदार प्राध्यापकांसाठी मोठी भरती मोहीम

    February 22, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.