Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » तंबाखूमुळे ४० वर्षीय प्रौधाचा गेला जीव !
    क्राईम

    तंबाखूमुळे ४० वर्षीय प्रौधाचा गेला जीव !

    editor deskBy editor deskNovember 6, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नाशिक : वृत्तसंस्था

    राज्यातील अनेकांना एका चुकीमुळे आपला जीव गमवावा लागत असल्याच्या घटना सातत्याने घडत असतांना अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. विहीतगाव भागात तंबाखूच्या पिचकारीमुळे एका ४० वर्षीय व्यक्तीचा जीव गेला. छतावरून पडल्याने ही दुर्घटना घडली आहे. रत्नाकर मदन बोराडे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    बोराडे गेल्या १७ ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास आपल्या घराच्या छतावर शतपावली करीत असतांना ही दुर्घटना घडली. तंबाखूचे सेवन करून ते शतपावली करीत असतांना पिचकारी मारण्यासाठी ते वाकले असता अचानक इमारतीवरून पडले होते. या घटनेत त्यांच्या पाठीस व मानेस दुखापत झाली. त्यानंतर भाऊ विनोद बोराडे यांनी त्यांना तातडीने आडगाव येथील मेडिकल कॉलेज येथे दाखल केले असता रविवारी (दि.५) उपचार सुरू असतांना डॉ. कशफ मोकाशी यांनी त्यांना तपासून मृत घोषीत केले. अधिक तपास जमादार सातभाई करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    विधानपरिषदेसाठी उद्धव ठाकरेंचा आघाडीचा एकमुखी पाठिंबा; सुप्रिया सुळे यांच्या ट्विटने राजकारणात नवा रंग !

    April 23, 2026

    सप्तशृंगी गडावर चांदी अपहार प्रकरण : २२ किलोहून अधिक चांदी गायब !

    April 23, 2026

    ‘शिवाजी कोण होता’ पुस्तकावरून वाद पेटला; आमदार संजय गायकवाड यांची प्रकाशकाला धमकी !

    April 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.